Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० जून, २०२६

इस्रो भेटीनंतर आलेल्या कु. प्रीती विटकर हिचा युग प्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा. मंगळवार, ३० जून २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



इंदापूर येथील 

मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालयाची गुणवंत विद्यार्थीनी कु. प्रीती विटकर हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) भेटीसाठी झालेली निवड ही इंदापूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. इस्रोला प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या कु. प्रीती विटकर हिचा युग प्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इंदापूर येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात सोमवारी दि.२९ जून रोजी संपन्न झालेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती कार्यक्रमात प्रसिद्ध शिवव्याख्याते, शिवश्री डॉ. श्रीमंत कोकाटे सर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी युग प्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष ( प्रभारी ) अमोल खराडे, राहुल शेवाळे, कैलास कदम, निवास शेळके, कृष्णा ताटे, हमीद आतार, पोपट पवार, ॲड. इनायतअली काझी, संतोष मखरे, श्री. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

कु. प्रीती विटकर हिचे कौतुक करत तिच्या यशामागील मेहनत, जिद्द आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे डॉ. कोकाटे यांनी विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात पुढे येऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन देखील डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.

कु. प्रीती विटकर हिच्या इस्रो भेटीमुळे राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी  मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 कु. प्रीती विटकर हिच्या सन्मानाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, सचिव ॲड. समीर मखरे यांनी तिचे अभिनंदन केले. सन्मानार्थी कु. प्रीति विटकर, प्राचार्या समता मखरे तसेच मार्गदर्शक शिक्षक प्रा. सोमनाथ माने, प्रा. संतोष चोरमले, प्रा. रविंद्र रोकडे, प्रा. नामदेव गानबोटे, प्रा. अक्षय क्षत्रिय, प्रा. मेघा यादव यांचे देखील संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांनी कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा