*करमाळा प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9850686360*
'SIR' मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सोलापूर जिल्हा (ग्रामीण)कार्यकारिणी,जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, महिला पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते यांची बैठक उत्साहात संपन्न झाली.
यावेळी संघटनात्मक बळकटी, बूथस्तरावरील नियोजन, जनसंपर्क अधिक प्रभावी करण्याबरोबरच पक्षाची भूमिका प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा केली. आगामी काळात संघटनेची ताकद अधिक दृढ करून प्रत्येक कार्यकर्त्याच्या सक्रिय सहभागातून मोहिम यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते,आमदार संजयमामा शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष .उमेशदादा पाटील,जेष्ठ नेते मा.जि.प.अध्यक्ष .बळीरामकाका साठे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते .मनोहरभाऊ डोंगरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपुर तालुक्याचे नेते .कल्याणराव काळे,मा.जि.प.उपाध्यक्ष .शिवानंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. तसेच या बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा