इंदापूर, डॉ. संदेश शहा.
दिनांक २५ जून २०२६
टाईम्स 45 न्यूज मराठी
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळाव्याचे संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात इंदापूरच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तथागत गौतम बुद्ध मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मातोश्री रमाबाई आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना आणि संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शकुंतला मखरे यांनी भूषवले. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, नानासाहेब चव्हाण, सुरज धाईंजे, प्राचार्या समता मखरे, प्राथमिकचे प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे व पालकांचे संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुलाबपुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रा. जावेद शेख यांनी शाळेतील विविध उपक्रम, शैक्षणिक सुविधा व संस्कारक्षम वातावरण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम याबाबत पालकांना माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा, पालक व शिक्षक यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांनी केले.
यावेळी नानासाहेब चव्हाण, प्राचार्या समता मखरे यांची भाषणे झाली. अध्यक्षा शकुंतला मखरे यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरालाल चंदनशिवे तर उपप्राचार्या सविता गोफणे, पालक प्रतिनिधी मोहिनी थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचलन नानासाहेब सानप यांनी तर आभार मनिषा मखरे यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा