इंदापूर डॉ. संदेश शहा.
दिनांक २५ जून २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडीचे सुपुत्र व महावितरणचे कर्मचारी कै. सागर लक्ष्मण झगडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृती जपण्यासाठी स्वराज्य दहीहंडी संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
मंगळवार दि.२३ जून रोजी सायंकाळी भिमाई आश्रमशाळे तील विद्यार्थ्यांना स्वराज्य दहीहंडी संघाचे अध्यक्ष दीपक अण्णा देव्हारे यांच्या हस्ते केळी, बिस्किटे तसेच वही, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून सामाजिक बांधिलकीचा आदर्श संघाने निर्माण केला आहे.
यावेळी स्वराज्य दहीहंडी संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ॲड. समीर मखरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कै. सागर झगडे यांच्या स्मृतींना सामाजिक कार्यातून दिलेली ही अनोखी मानवंदना ठरली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा