Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ जून, २०२६

*अकलूज येथे काशी जगद्गुरूंची मिरवणुक व मार्ग हा मुक्तीचा ग्रंथदिंडी कार्यक्रम संपन्न.*

 *अकलूज-- प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


अधिक मास निमित्त वीरशैव लिंगायत समाज अकलूज यांनी काशी ज्ञानसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या मार्ग हा मुक्तीचा या ग्रंथाची पालखी व जगद्गुरू यांची रथामधून मधून मिरवणूक काढण्यात आली. महाराजांचे स्वागत गांधी चौक येथे गिरीश शेटे व परिवार यांच्या हस्ते करण्यात आले.सदर मिरवणूक गांधी चौक येथून महादेव मंदिर बसवेश्वर चौक येथे आली याठिकाणी सुवासिनींनी कलशामधील पाणी महाराजांच्या पायावर घालून मंदिरामध्ये स्वागत केले.या कार्यक्रमाची सुरुवात  १००८ डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, राजगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज,शिंगणापूर, सदाशिव शिवाचार्य वेळापूरकर महाराज तसेच समाजाचे अध्यक्ष राजूभाऊ गुळवे,महालिंग राऊत,महिला अध्यक्ष सौ राजश्री ताई गुळवे,बापू वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.


        जगद्गुरुंचा सत्कार समाजाचे अध्यक्ष राजूभाऊ सौ उत्कर्षा गुळवे यांनी केला तर शिंगणापूर महाराजांचा सत्कार महालिंग राऊत व वेळापूरकर महाराज सत्कार  गणेश नरुळे या उभयतांच्या हस्ते करण्यात आला.जगद्गुरूंची पाद्यपूजा श्री व सौ प्रकाश डीकोळे यांच्या हस्ते करण्यात आली.



      या नंतर जगद्गुरुंचे झाले ज्यामध्ये त्यांनी लिंगायत समाज व संस्कार यांची माहिती दिली तसेच ग्रंथाची माहिती दिली,तसेच शिंगणापूर महाराज चार धाम यात्रा करून आले होते त्यांचा सन्मान जगद्गुरू यांनी केला. या नंतर महा आरती श्री व सौ भीमाशंकर वैद्य यांच्या हस्ते झाली. आरती नंतर महाराजांनी सर्वांना आशीर्वाद व प्रसाद दिला.

      वीरशैव लिंगायत समाजाने आयोजित केलेल्या आन्नदानाचा सर्वांनी लाभ घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास उरवणे सर यांनी केले कार्यक्रमास पंचक्रोशी मधील लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा