*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील अवैध हातभट्टी विषारी दारूमुळे आतापर्यंत तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे याला राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही हप्तेखोर आधिकारी व पोलीस कर्मचारी जबाबदार असुन 13 आधिकारी व 9 पोलीसांना निलंबित करण्यात आले असून राज्यात या घटनेने खळबळ माजली आहे.राज्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागात अवैध देशी विदेशी ,हातभट्टी दारूचे धंदे राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांच्या कृपा आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत असा जाहीर आरोप भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना केला आहे .अधिक बोलताना कांबळे म्हणाले की गाव खेड्यात वाडी वस्तीवर हातभट्टी दारूच्या भट्या आहेत हे राजरोसपणे हे लोकं दारू काढत असुन यांच्याकडून राज्य उत्पादन शुल्क व पोलीसांना हप्ते दिले जातात तसेच गोवा राज्यातून बनावट देशी विदेशी दारू महाराष्ट्रात आणून त्याची हाॅटेल व ढाब्यावर मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते वास्तविक पाहता हे नागरिकांच्या आरोग्यासाठी बनावट दारू हानिकारक असुन सोलापूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ याकडे लक्ष देवून बनावट देशी विदेशी हातभट्टी दारू धंदे करण्याऱ्या विरोधात कडक कारवाई करावी अन्यथा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशाला उत्तरेश्वर कांबळे यांनी दिला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा