*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यातील कंदर येथील पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय स्कूल बॅग तसेच पाण्याची बॉटल मोफत पणे देणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष युवा नेते अण्णा पवार यांनी दिली
याबाबत अधिक माहिती देताना पवार पुढे म्हणाले की सोलापूर जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना येत्या 15 किंवा 16 जून रोजी मोफत शालेय बॅग तसेच पाण्याची बॉटल देणार असल्याची माहिती पवार यांनी बोलताना दिली कंदर तसेच परिसरातील सुमारे वीस जिल्हा परिषद शाळेत सदरचा उपक्रम राबविणार असल्याची माहिती पवार यांनी दिली गेली 20 ते 25 वर्षापासून सदरचा सामाजिक उपक्रम आम्ही राबवीत असून गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना सदर उपक्रमाचा लाभ मिळण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत असल्याचे शेवटी पवार बोलताना म्हणाले
कंदर येथील पद्म पंडित प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेने आजपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना मोफत बॅग तसेच पाण्याच्या बाटल्या वाटप करणे तसेच अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी पूर्ण खर्च करणे अनाथ गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे याशिवाय विविध उपक्रम राबवले अशा पद्धतीने पद्म पंडित प्रतिष्ठानने आजपर्यंत करमाळा तालुक्यामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबवून नावलौकिक मिळवले आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा