Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२६

जेऊर येथील प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट शहानुर सय्यद यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर २६ नोव्हेंबर२०२६ रोजी पुणे येथे होणार पुरस्काराचे वितरण

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा तालुक्यातील जेऊर येथील स्थानिक रहिवासी तसेच प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट शहानूर अहमद सय्यद यांना डॉक्टर भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार अर्थात नॅशनल अवॉर्ड घोषित झाला आहे


वकिली क्षेत्रात उल्लेखनीय असे कामकाज तसेच सामाजिक क्षेत्रात देखील कार्य केल्याबद्दल त्यांना सदरचा भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ नवी दिल्ली यांच्या वतीने सदरचा पुरस्कार घोषित झाला आहे हा पुरस्कार येत्या 26 नोव्हेंबर 2026 रोजी पुणे येथील पत्रकार भवन नवी पेठ येथे देण्यात येणार आहे सदरचा पुरस्कार भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे चीफ ऑर्गनायझर गोरख साठे यांनी अधिकृत पत्र देऊन घोषित केला आहे 

एडवोकेट शहानुर सय्यद हे गेली कित्येक वर्षापासून वकिली व्यवसाय करीत असून त्यांनी आजपर्यंत सामाजिक राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रात भरीव असे योगदान दिलेले आहे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सदरचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे त्यांचे घोषित झालेल्या पुरस्काराबद्दल  विविध स्तरातून. विशेष अभिनंदन होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा