इंदापूर, डॉ. संदेश शहा.
दिनांक १५ जून २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापूर येथील जोशी विठ्ठल मंदिरात जेष्ठ अधिक मास निमित्त गेली ४० वर्षापासून काकड आरतीचा यशस्वी उपक्रमाची यशस्वी सांगता झाली. गेली ४० वर्ष या मंदिरात निरंतरपणे इंदापूरातील महिला वर्ग कार्तिक महिन्यात व ज्या वर्षी अधिक महिना येतो, त्यावेळी काकड आरती साठी दररोज पहाटे षोडपचारे नैमत्तीक पुजा सामुहिकपणे करतात. यावेळी विविध काकड्याची गाणी महिला भावीकाकडून गायली जातात तर महाप्रसादाने काकड्याची सांगता होते. वरील उत्सवाची व्यवस्था रेखा जोशी व जोशी परिवाराकडुन केली जाते.
काकड्या साठी परिसरातील महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित असतो. याकामी मंजुश्री जोशी, अनुसया आनगरे, नंदा मोकाते, बेबीताई ढोले, कल्पना जौंजाळ, अंजली ढोले, रसिका देशपांडे, मेघा भंडारी, रेखा भंडारी, मेघा कुलकर्णी, महाजन, अरूंधती ओंकार, स्नेहल जकाते आदी महिला वर्ग कार्यक्रमात सहभागी झाले होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा