Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ जून, २०२६

*युवा नेते प्रवीणभैय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची मेजवानी; शैक्षणिक तुला, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शैक्षणिक मदतीचे वाटप*

*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी* 
*मो:-8378081147*


-----इंदापूर तालुक्याचे युवा नेते, माजी बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे तथा सोनाई उद्योग समूहाचे संचालक सन्माननीय श्री. प्रविणभैय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त प्रविणभैय्या माने मित्रपरिवाराच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.

यावेळी श्री. प्रविणभैय्या माने यांची शैक्षणिक तुला करण्यात आली. विशेष म्हणजे, वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार-तुरे किंवा इतर भेटवस्तू न आणण्याचे आवाहन त्यांनी यापूर्वीच नागरिकांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत इंदापूर तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांनी पुष्पगुच्छाऐवजी वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिली, दप्तर आणि इतर शालेय उपयोगाच्या वस्तू भेटस्वरूपात आणल्या. या सर्व शालेय साहित्याचे संकलन करून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.




शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई कदम विद्यालय, इंदापूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. प्रविणभैय्या माने यांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

तसेच विद्यालयातील प्रत्येक वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे आणि गुणवत्तेला योग्य सन्मान मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यालयातील होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी श्री. प्रविणभैय्या माने यांनी विशेष पुढाकार घेतला. विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील संगणक शिक्षण शुल्क तसेच शालांत परीक्षा शुल्कासाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. यासंदर्भातील धनादेश श्री. प्रविणभैय्या माने यांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. शिणगारे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रवीणभैय्या माने यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करताना, वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या दिवसाचे रूपांतर समाजोपयोगी उपक्रमांमध्ये करणे ही अनुकरणीय बाब असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.

श्री. प्रविणभैय्या माने मित्र परिवार यांच्यावतीने विशाल रणवरे, रविराज चव्हाण, निलेश जाधव, साधु नरुटे, माधव फलफले, प्रविण निगडे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम राबविण्यात आले.

भविष्यातही प्रविण माने यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून तालुक्यातील विविध शाळांतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

शिक्षणाला बळ देणारे, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे आणि गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणारे हे उपक्रम इंदापूर तालुक्यात कौतुकाचा विषय ठरले असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणारा हा वाढदिवस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा