*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
यशवंतनगर (फुले वस्ती) येथील येथील जिल्हा परिषद शाळेत स्वर्गीय सुदर्शन हंबीरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थीच्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचे व खाऊ वाटप करण्यात आले.
स्व.सुदर्शन हंबीरे हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेळापूर शाखेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते.तसेच मराठा सेवा संघाच्या तालुका उपाध्यक्ष होते.काही दिवसांपुर्वी त्यांचे दु:खद निधन झाले होते.त्यांचा आज वाढदिवस होता.त्या प्रित्यर्थ एक आठवण म्हणून शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.माळशिरस तालुक्याच्या जिजाऊ बिग्रेडच्या तालुकाध्यक्ष शारदा चव्हाण यांच्या वतीने शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास शारदा चव्हाण,शिक्षीका कविता हिंगमिरे, स्नेह ताटे व पालक वर्ग उपस्थित होता.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा