Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २६ जून, २०२६

*खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना केलेल्या शिवीगाळीच्या निषेधार्थ जनशक्ती संघटना, करणार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थाना समोर धरणे आंदोलन*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*





खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना केलेल्या शिवीगाळीचा निषेध व सोमवार, दि. २९/०६/२०२६ रोजी संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानासमोर "काळी फीत धरणे आंदोलन करणार असल्याचे जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष, अतुल खूपसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य मुंबई-महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मुंबई-पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई- मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मुंबई-आदींना निवेदनाद्वारे कळविले असून त्याबाबत सविस्तर वृत्त असे कि 

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार बांधवांना जाहीरपणे केलेली अत्यंत हीन दर्जाची शिवीगाळ व असभ्य वर्तन हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. लोकप्रतिनिधीचे हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे.

याचा तीव्र निषेध करण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी, खासदार संजय दिना पाटील यांच्या खालील निवासस्थानासमोर एक दिवसीय शांततापूर्ण 'काळी फीत' धरणे आंदोलन करण्यात येणार अजून . या आंदोलनासाठी सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत.

आंदोलनाचे ठिकाणः संजय अपार्टमेंट, दिना पाटील इस्टेट, स्टेशन रोड, भांडुप (प.), मुंबई.

यासंदर्भात जनशक्ती संघटनेच्या मागण्याः

१. खासदारांच्या या वर्तनाची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने कायदेशीर व नैतिक कारवाई व्हावी.

२. राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी केली जावी.

सदर आंदोलन पूर्णपणे शांततेच्या व कायदेशीर मार्गाने केले जाईल. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी.

 ही प्रत माहितीस्तव  व कारवाईसाठी 

१) मा. लोकसभा अध्यक्ष, नवी दिल्ली.

२) मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.

३) मा. पोलीस आयुक्त, मुंबई.

४) मा. भारतीय प्रेस परिषद (PCI).

५) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भांडुप पोलीस स्टेशन, मुंबई

६) पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती.

इत्यादींना पाठवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले

कळावे आपला

अतुल खुपसे पाटील ,संस्थापक अध्यक्ष जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा