*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज मधील ताहेरा फाउंडेशन ही सर्व जाती धर्माच्या समाजाच्याb लोकांच्या उन्नतीसाठी कार्य करणारी सामाजिक ट्रस्ट असून तिच्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल राजकीय समीक्षक, प्रसिद्ध वक्ते, ॲड. अविनाश काले यांनी गौरवउदगार काढले. ॲड. काले यांनी विद्यार्थी व पालकांना वेगवेगळी उदाहरणे सांगत स्वतःच्या जीवनामध्ये एक ध्येय समोर ठेवून यशासाठी परिश्रम करण्याचे आवाहन केले. काले यांचे मनापासून चे विविध उदाहरणे व दाखले दिल्याने बोलणे उपस्थित विद्यार्थी व पालकांच्या मनात नक्कीच घर करून राहिले. सालाबाद प्रमाणे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.अविनाश काले उपस्थित होते. या प्रसंगी अकलूज नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ नम्रताताई
जगताप उपस्थित होत्या.सुरुवातीला इलाही बागवान यांनी कार्यक्रमाचे स्वरूपाची मांडणी करताना ताहेरा फाउंडेशनच्या विविध उपक्रमाची ओळख उपस्थित पाहुणे व पालकांना करून दिली. ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी प्रस्ताविकात माणसाच्या जीवनात शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगून ताहेरा फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक कार्यात जाणीवपूर्वक लक्ष देण्याचा आवर्जून उल्लेख केला.
सदर कार्यक्रमात दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ताहेरा फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी सुंदर सॅक भेटवस्तू म्हणून देण्यात आली. दहावी-बारावीच्या अरबाज बागवान,रिदा शेख, मुस्कान बागवान अलमास मकानदार, मुजमिल तांबोळी, मोहसीन तांबोळी, उबेद आतार, अली अकबर मकानदार,जवेरिया तांबोळी या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला.
.पंचवटी-अकलूज येथील मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या गायत्री क्षीरसागर हिचा विशेष सन्मान हाजी अबुबकरभाई तांबोळी व खजिनदार हाजीअसलम तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रमात गायत्री क्षीरसागर यांच्या पालकांनाही त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी हाजानीमा शाफिया तांबोळी, खजिनदार हाजी असलमभाई तांबोळी,हजानीमा जुबेदा तांबोळी, साजिद सय्यद,भैया माडेकर,मेंबर दादाभाई तांबोळी , इंजिनीयर सरफराज तांबोळी, युनूस मुलाणी, मेंबर जावेद बागवान. शकील मुलाणी सर,छोटा जावेदभाई बागवान, नाझीम खान रत्नाई पार्क मधील प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना पाठीवर साहित्य ठेवण्यासाठी दिलेली सॅक ही कायमची पाठीवर शाब्बासकीची थाप असल्याची भावना नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत होती.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा