Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १९ जून, २०२६

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त तुळजापूरात महाआरती व महाप्रसाद वितरण

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



तुळजापूर : शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त तुळजापूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने श्रीक्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेला विधिवत महाआरती करण्यात आली. यावेळी राज्याच्या तसेच जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी साकडे घालत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आशीर्वाद मागितले. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेले शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, राज्यात विकासाचा वेग कायम राहावा आणि शेतकरी बांधवांचे चांगले दिवस पुन्हा यावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली.

शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाने मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. पक्षाच्या ६० वर्षांच्या वाटचालीचा गौरव करत कार्यकर्त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली. यावेळी शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या कार्यक्रमास तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, उपतालुकाप्रमुख विकास जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, शहरप्रमुख बापूसाहेब भोसले, शहर संघटक नितीन मस्के, संजय लोंढे, संभाजी नेपते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआरती आणि महाप्रसाद वितरणाच्या माध्यमातून शिवसेनेच्या वर्धापन दिनाला धार्मिक व सामाजिक स्वरूप प्राप्त झाले असून, तुळजापूरातील शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम यशस्वी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा