*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
रंगीबेरंगी फ़ुगे आणि फुलांनी सजलेली बैलगाडी...आणि त्यात उभे असणारी चिमुकली मंडळी... सगळीकडे ओसंडून वाहणारा उत्साह..पालकांची अलोट गर्दी... हे दृश्य आहे चक्क एका जिल्हा परिषद शाळेतील....!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरंदावडे येथे शाळेच्या पहिल्या दिवशी अनोख्या अशा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला पहिलीतील सर्व नवागतांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. चिमुकल्यांच्या पावलांचे ठसे घेऊन ते पालकांना देण्यात आले.सर्वांच्या खिशाला त्यांच्या नावाचे सुरेख असे ओळखपत्र झळकत होते.नंतर सर्वांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी शाळेत नव्याने दाखल सर्व मुलांचे स्वागत संपन्न झाले
यावेळी व्यासपीठावर सरपंच राणी मोहिते,उपसरपंच देविदास ढोपे,पोपटराव गरगडे, विकास सोसायटीचे चेअरमन जनार्दन शिंदे,मोहनानंद महाराज, उपसरपंच नामदेव बोडरे, ग्रामपंचायत सदस्या सुनीता ओवाळ,पोलीस पाटील,शेखर ओवाळ,माजी मुख्याध्यापक फाळके सर,ज्ञानदेव राऊत,विजय रुपनवर येळीव येथील श्री.देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रस्ताविकांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक डॉ.प्रेमनाथ रामदासी सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेऊन भविष्यातील योजनावर प्रकाश टाकला.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी मोहनानंद महाराज यांनी आपल्या ओघावत्या व रसाळ शैलीत सर्वाना मार्गदर्शन केले.यावेळी पोपटराव गरगडे व उपसरपंच देविदास ढोपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सुनीता आंदळकर,स्वाती गायकवाड,श्रद्धा कुलकर्णी,शुभम म्हसवडे यांनी विशेष परिश्रम घेतले. पुरंदावडे गावातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचेही सहकार्य लाभले.यावेळी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*चौकट*
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व विधान परिषदेचे माजी आमदार मा श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट यशवंतनगर अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या वतीने शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा