Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ जून, २०२६

*जि.प.प्रा.शाळा,देशमुखपट्टा येथे प्रवेशोत्सव समारंभ संपन्न*

 *अकलूज --प्रतिनिधी* 

*केदार लोहकरे* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुखपट्टा (ता.माळशिरस) येथे आज प्रवेशोत्सव,नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत,पाठ्यपुस्तक वितरण व गणवेश वितरण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम गुजर सर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.नकुशा पांडुरंग कोकरे उपस्थित होत्या.


              प्रवेशोत्सवानिमित्त शाळेच्या प्रवेशद्वारावर नारळाच्या झावळ्यांपासून आकर्षक व देखणी कमान उभारण्यात आली होती. नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले.इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या पावलांचे स्मरण जपण्यासाठी त्यांच्या पावलांचे ठसे कपड्यावर घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला.त्यामुळे विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्यात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.या कार्यक्रमास मूल्यवर्धन तालुका समन्वयक राजाराम गुजर सर नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच त्यांनी कृतीयुक्त आनंदगीते सादर करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,आनंद आणि शाळेविषयी आपुलकी निर्माण केली.

             या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सर्व सदस्य,माता- पालक,ग्रामस्थ केले होते.त्यांची या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती.सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार व संस्मरणीय ठरला.या शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा घोरपडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका सचिता ठोंबरे यांनी यांनी केले या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पालक वर्गांचे मोलाचे सहकार्य लाभले.नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्साह आणि उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आजचा प्रवेशोत्सव खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.त्याच बरोबर कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी त्यांना काजू- बदामयुक्त स्वादिष्ट शिरा व पुलावभात देण्यात आला. विद्यार्थ्यांनी या अल्पोपहाराचा मनमुराद आनंद घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा