*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना नम्र विनंती करण्यात येते की, सध्या उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असून भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी पाण्याचा वापर जपून व जबाबदारीने करावा. असे कळकळीचे आवाहन करमाळा नगरपालिका नगराध्यक्षा मोहीनी सावंत यांनी करमाळा शहरातील नागरिकांना केले आहे
महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी खालील बाबींचे पालन करावे.
पिण्याच्या पाण्याचा वापर फक्त अत्यावश्यक कामांसाठी करावा,.
पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी,.
गाडी धुणे, बागेला जास्त पाणी देणे व इतर अनावश्यक वापर टाळावा,.
गळती असलेले नळ व पाइपलाइन तात्काळ दुरुस्त करावेत,.
बेकायदेशीर पाणी उपसा करू नये,.
पाणी ही अमूल्य संपत्ती आहे. आजची बचत, उद्याचे सुरक्षित भविष्य आहे. असे सावंत बोलताना म्हणाल्या
आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच भविष्यातील पाणीटंचाई टाळणे शक्य होणार आहे. तेव्हा करमाळा नगरपालिकेतील सर्व नागरिकांनी पाण्याचे योग्य जपून नियोजन करावे असे आवाहन शेवटी नगराध्यक्षा
मोहिनी ताई संजय सावंत – नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद, अतुल फंड उपनगराध्यक्ष, करमाळा नगर परिषद, विक्रमसिंह परदेशी – पाणीपुरवठा सभापती यांनी केले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा