*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान श्री क्षेत्र तुळजापूर येथील सेक्युरिटी BVG व SISPL हाउस कीपिंग कंपनी यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी तुळजापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी उपेंद्र तामोरे --अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान श्रीक्षेत्र तुळजापूर यांना निवेदनाद्वारे केले असून त्याबाबत सविस्तर मागणी अशी की
, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मध्ये सुरक्षा व हाउसकीपिंग व्यवस्थेसाठी गेल्या 10 ते 15 वर्षापासून खाजगी कंपनीकडून सिक्युरिटी कंपनीतर्फे व्यवस्था पुरवली जात आहे. परंतु किती सेक्युरिटी गार्डन व हाउसकीपिंग साठी कर्मचारी मंदिरात कामावर आहेत? त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण असते? त्यांचे हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने करावी अशी अट निविदेमध्ये आहे. मग हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाते का? केली असल्यास त्याची सत्यप्रत देण्यात यावी. सिक्युरिटी कंपनी व मंदिर संस्थांमधील कर्मचारी यांच्या संगणमताने काही बोगस पुजारी यांच्या मदतीने श्री. तुळजाभवानी मातेचे दर्शन व्ही.आय.पी गेटमधून भाविकांना घुसवून दर्शन देत आहेत. यामध्ये कंपनीचे सुपरवायझर आर्थिक व्यवहार करून संगणकांनी गैरमार्गाने वागत आहेत. त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स । फुटेज उपलब्ध आहेत. यामुळे सर्वसामान्य भाविकांना तासन्तास दर्शन मंडपामध्ये उभे राहावे लागत आहे. काही पुजारी मुळे अधिकारी व कर्मचारी मुळे देवस्थानची बदनामी होत आहे. तरी सर्व गोष्टींवर गांभीर्याने विचार व्हावा अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असाही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून
या निवेदनावर काँग्रेसचे मा. जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, नगरसेवक -अमोल कुतवळ, नगरसेवक -रणजीत इंगळे, नगरसेवक- आनंद जगताप, नगरसेवक -अक्षय परमेश्वर, नगरसेवक -प्रगती गोपाळ लोंढे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा