Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १५ जून, २०२६

रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालयात नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत*

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

दिनांक १५ जून २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये आज शाळेच्या पहिल्या दिवशी पाचवी ते बारावी अखेर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ आज पासून सुरू झाले असून या दिवसाची सुरुवात उत्साहाने व आनंदाने झाली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजने अंतर्गत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने प्राचार्य संजय कुमार शिंगारे यांनी शाळा समितीवर निवड झाल्याबद्दल विठ्ठल ननवरे, विजय शिंदे व  कैलास कदम यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.शाळा समिती सदस्य विठ्ठल ननवरे व कैलास कदम यांनी विद्यार्थी व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी व भौतिक सुविधांसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, पर्यवेक्षिका पुष्पा काळे,  पालक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोहिते यांनी तर धनसिंग भोसले यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा