Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १५ जून, २०२६

*महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव व मोफत पुस्तक वाटप सोहळा उत्साहात संपन्न*

 *यशवंतनगर-- प्रतिनिधी*

 *नाझिया  मुल्ला*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर येथे नविन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थी प्रवेशोत्सव व मोफत पुस्तक वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट, रंगीबेरंगी रांगोळ्या, फुलांची आरास आणि स्वागत फलकांमुळे आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभातफेरीद्वारे "शिक्षण हेच खरे सामर्थ्य" हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पवर्षावात स्वागत करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्सुकता सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. स्वागत गीतातून सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.


मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वारसा जपण्याचे आवाहन केले. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभा देवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभ हस्ते अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन पुस्तके हातात घेताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये उज्ज्वल भविष्यातील स्वप्ने झळकत होती.

               कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेरणा, आत्मविश्वास आणि शाळेविषयी आपुलकी निर्माण करणारे वातावरण अनुभवायला मिळाले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.



        हा प्रवेशोत्सव केवळ स्वागत समारंभ न राहता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील नव्या पर्वाची प्रेरणादायी सुरुवात ठरला. ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

    कार्यक्रमासाठी नवागत पालक , व्यवस्थापन समिती सदस्य महादेव लोखंडे, उपमुख्याध्यापक आसिफ झारेकरी, पर्यवेक्षक उमेश बोरावके,शिक्षक प्रतिनिधी राजाराम काळे, शिक्षिका प्रतिनिधी भाग्यश्री उरवणे , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर दुपडे यांनी केले तर आभार नागेश सोनवणे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा