*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
वाहतूक शाखेचे भरणे टेंभुर्णीला; वैरागचे गावडे आले सोलापूर तालुक्याला ; ग्रामीण पोलिसच्या 11 पीआय अन् 2 एपीआय च्या बदल्या
सोलापूर -सोलापूर ग्रामीण पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. ग्रामीण पोलीस दलातील 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या 11 पोलीस निरीक्षक (PI) आणि 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या (API) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी 29 जून 2026 रोजी जारी केले आहेत.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची जुनी नियुक्ती आणि नवीन पदस्थापना-
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अविनाश एकनाथ पवार यांची बदली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. तर वैराग पोलीस ठाणे ते कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक कुंदन तुकाराम गावडे यांची बदली सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे करण्यात आले आहे. नियंत्रण कक्ष येथे कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक दीपक ज्योतिराम पाटील यांची बदली मोहोळ पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.
वाहतूक शाखा येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बाळू रसिक भरणे यांची बदली टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अमूल शंकर कादबने यांची बदली वैराग पोलीस ठाणे येथे करण्यात आले आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दशरथ भानुदास वाघमोडे यांची बदली माळशिरस पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यूब मुजावर यांची बदली पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुरेश गणपतराव चिल्लावार यांची बदली पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे करण्यात आले आहे. माळशिरस पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विकास चन्नवीर दिंड्डेरे यांची बदली सायबर पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दीपक लक्ष्मण बरडे यांची बदली जिल्हा वाहतूक शाखा येथे करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक कमलाकर नरसिंह गड्डीमे यांची बदली नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखा येथे करण्यात आली आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय आप्पासो सोनवणे यांची बदली बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आले आहे. तर आर्थिक गणेशा येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अण्णासाहेब कड यांची बदली सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा