इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
अकलूज ( जिल्हा सोलापूर ) येथील
श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भव्य
डे - नाईट टर्फ क्रिकेट स्पर्धेत पंढरपूर येथील टीम डेविल्स संघाने पंढरपूर येथील टीम क्लाशेर्स संघांचा अंतीम सामन्यात १९ धावांनी पराभव करून सन्मती चषक पटकावला. या स्पर्धेत एकूण १२ संघानी भाग घेतला होता. या स्पर्धा रविवार दि. ३१ मे २०२६ रोजी श्रीराम स्पोर्ट्स अरेना, माळेवाडी (अकलूज) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी उत्कृष्ट संघ म्हणून श्री लक्ष्मीसेन स्वामीजी सुपर किंग्स अकलूजने पारितोषिक प्राप्त केले.
या क्रिकेट सामन्यांचे सहप्रायोजकत्व डॉ. सतीश दोशी यांनी स्वीकारले होते.
या डे-नाईट टर्फ क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मिहीरभई गांधी, दलाचे विद्यमान अध्यक्ष तेजस गांधी तसेच दलाचे सर्व माजी अध्यक्ष आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भ. महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि नाणेफेक करून झाला.
यावेळी उद्घाटक मिहिरभई गांधी म्हणाले, सोलापूर
जिल्ह्यातील जैन समाजातील युवा वर्ग एकत्र यावा, त्यांच्या मध्ये खिलाडू वृत्ती, परस्पर मैत्री, आपुलकी आणि समाजबंध अधिक दृढ व्हावेत, अनेक जैन तरुणांच्या अंगात टॅलेंट आहे त्यास व्यासपीठ उपलब्ध व्हावे, सोशल माध्यमाच्या डिजिटल स्क्रिनवर गुंतलेल्या पिढीलाही खऱ्याखुऱ्या मैदानावर उतरून 'डिजिटल पॉज' देण्याचा या स्पर्धा आयोजनामागचा मुख्य हेतू होता. समाजातील युवकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उद्देश निश्चित सफल झाला आहे. गुणवंत खेळाडूंना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर पुढील व्यासपीठ मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही मिहीरभई गांधी यांनी दिली.
विशेष म्हणजे सामन्यांचे थेट प्रक्षेपण लाईव्ह करण्यात आले होते. त्याचा लाभ हजारो क्रिकेट प्रेमींनी घेतला. सहभागी खेळाडू व उपस्थित बांधवांसाठी सेवा दलाच्या वतीने दिवसभर चहा, पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स अकलूज, बावडा वारिअर्स, श्री लक्ष्मीसेन स्वामीजी सुपर किंग अकलूज, कुंथुनाथ ग्रुप, टीम फ्रेंड्स अकलूज, टीम ब्लेझिंग लॉयन्स नातेपुते, श्री जिनसेन स्वामीजी स्टाइकर्स अकलूज, टीम डेव्हील्स पंढरपूर, णमोकार वारीअर्स अकलूज, अकलूज टायटन्स, टीम क्लशेर्स पंढरपूर या संघानी भाग घेतला. अंतिम सामना हा टीम डेविल्स पंढरपूर विरुद्ध टीम क्लाशेर्स पंढरपूर या टीममध्ये होऊन यामध्ये टीम डेविल्स पंढरपूरने रोमहर्षक विजेतेपद संपादन केले. विशेष म्हणजे हे सामने प्रत्येकी आठ षटकांचे खेळविण्यात आले होते. आठ-आठ ओव्हर्सचे होते. स्पर्धेचे धावते बहारदार समालोचन अनंत कुलकर्णी व संदीप पिसे यांनी केल्याने या खेळाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. सर्व सामन्यांमध्ये निष्पक्ष व दर्जेदार पंच म्हणून ज्ञानेश शिंदे व अनिल रेवंडे यांनी काम पाहिले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा