*अकलूज-- प्रतिनिधी*
*केदार. लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने श्रीमंत छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.
या पुरस्कार सोहळ्यात माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार उत्तमराव शिवदास जानकर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शेळीमेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष ॲड.सुभाष बाळासाहेब पाटील,गणेश संदिपान कचरे उपसचिव कृषी विभाग मंत्रालय मुंबई,डॉ.विठ्ठल आत्माराम कवितके प्रगतशील शेतकरी,विठ्ठल रामा झंजे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल हनुमंतराव राजाराम देवकाते,डॉ.सौ.शुभदा स्वपनिल पोटे यांनी समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी मदनसिंह मोहिते-पाटील,किशोरसिंह माने- पाटील,माजी आमदार रामभाऊ सातपुते,धवलसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.रेश्माताई अडगळे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष किरण धाईजी,भारतीय जनता पक्षाचे अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे,तुकाराम भाऊ देशमुख विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यांनी अभिवादन केले तसेच सायंकाळी सहा वाजता अकलूज शहरातून भव्य मिरवणूकीस पारंपारिक पद्धतीने सुरुवात केली.या मिरवणुकीची सुरुवात अकलूज विभागाचे डिवायएसपी संतोष वाळके यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली.यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाकाल अघोरी ताडंव नृत्य सादर केले.गजीढोल व फलटण येथील ढोलीबाजा पथक यांनी मनमोहक सादरीकरण केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक दिलीप होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती समारंभ समीतीचे अध्यक्ष नागेश्वर पोट,स्वपनील होनमाने, यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली अध्यक्ष लक्ष्मीकांत वाघे,निलेश ठोंबरे,राहुल मोटे,परशूराम माने,सुनील पिसे, गणेश श्रीराम,अमर गडदे,सोमनाथ सरगर,प्रकाशशेठ मासाळ, तात्यासाहेब नायकुडे,संजय पाडोळे,विशाल काळे,अमोल काळे,बापूसाहेब दडस,तुषार वगरे, महादेव देवकाते,राजू गोरे,संजय पिसे,कैलास चोरमले,कुणाल होनमाने,सचिन सरगर,आबासाहेब घुले पाटील,राजू सलगर,आनंद हंडाळ,कौशिक होनमाने,अजीनाथ घोडके,तुषार पाडूळे,रोहन पांढरे, ऋषिकेश मोटे,दक्ष वाघमोडे,सार्थक पिसाळ,आकाश खरात यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी केला.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा