Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ जून, २०२६

हिंदु मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेला इंदापूरचा मोहरम पारंपरिक पद्धतीने साजरा.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा*.

*दि.२७ जून २६*

*टाईम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*



इस्लामी वर्षाचा पहिला महिना असलेल्या मोहरम निमित्त इंदापूर शहरात आबालवृद्ध नागरिकांचे आकर्षण असलेली पंजे व ताबूत मिरवणूक पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली. यावेळी मुस्लिम बांधवांनी करबला येथील युद्धात अन्यायाविरुद्ध लढताना शहीद झालेल्या हजरत इमाम हुसेन आणि सहकाऱ्यांच्या प्रती शोक व्यक्त केला. सकाळी सुरुवात झालेल्या इमाम हुसेन

यांचे पंजाची गावभेटी दुपारपर्यंत संपन्न


झाल्या. त्यानंतर  संध्याकाळी साडेसात वाजता मानाच्या ताबुतांचे मिरवणूकीस सुरुवात झाली. सर्व 

प्रथम सातपुडा येथील ताबूत, नंतर

बागवान जमातचा ताबूत निघाले.


त्यानंतर इंदापूरच्या इतिहासात 

विशेष महत्व असणाऱ्या

हसेन - हुसेन यांचे

शेख मोहल्ला व कसबा

येथील ताबूतांचे आगमन नेहरू चौकात झाले. यावेळी

तांबूतांचे पुढे राजू इंगोले यांची

उदानाची गाडी व नगारागाडी

होती.परंपरेनुसार हसेन हुसेन शेख मोहल्ला व कसबा ताबूत

यांची डावी उजवी म्हणजे 

हसेन हुसेन तांबूतांच्या

भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी

हैदोस्त - दुल्हा याचा जयघोष केला. हे दोन्ही ताबूत संपूर्ण पांढऱ्या शुभ्र वस्त्रापासून 

तयार केले जात असून  ही प्राचीन काळापासूनची परंपरा

जपत आहेत. म्हणूनच या ताबूतांचे सर्वांना खूप आकर्षण असते.

एक ताबूत बनवण्या साठी सुमारे १५० ते २०० मीटर कापड

 लागते. नेहरू चौकात

भेट झाल्यानंतर हे ताबूत एकत्र मिळूनच पुढे मुख्य रस्त्याने

खडकपूरा शिवाजी चौकात जातात. तेथेच 

विधिवत फातेहखानी होऊन ताबूत

वेगवेगळ्या मार्गाने रवाना होतात. त्यांची पुढच्या वर्षी पुन्हा परंपरे प्रमाणे भेट होते. 

इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, गट नेते शकील सय्यद, नगरसेवक उमेश मखरे, शुभम पवार, अक्षय सूर्यवंशी, आरशाद सय्यद आदींनी शहरातील विविध ताबूत यांना भेटी दिल्या तर नेहरू चौक येथे माजी नगराध्यक्ष 

प्रदिप गारटकर,

नागरी संघर्ष समितीच्या

वतीने मानाच्या ताबुतांचे स्वागत

कृष्णा ताटे, हमीद आतार, महादेव चव्हाण, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट गजानन पवार

यांनी केले.

मोहरम कमिटीचे इब्राहीम शेख, अय्याज शेख, दादा इनामदार, बाबाजान शेख,

मुख्तार सय्यद, फिरोज पठाण यांनी परिश्रम घेतले.

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे व सहकाऱ्यांनी

चोख बंदोबस्त ठेवला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा