*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
पद्म पंडित प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुनर्वसन कंदर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगा व पाणी बॉटल वाटप करण्यात आले
आज दिनांक 15 /6/ 2026 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी पद्म पंडित प्रतिष्ठान कंदर या सेवाभावी संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व मुला-मुलींना स्कूल बॅग व पाणी बॉटल वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी पद्म पंडित प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब पंडित पवार यांनी सलग तिसऱ्या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुनर्वसन कंदर येथे स्कूल बॅग व पाणी बॉटल वाटप केले या कार्यक्रमाबद्दल व शाळेबद्दल माननीय श्री अण्णासाहेब पंडित पवार व श्री संपत काका सरडे यांनी शाळेच्या प्रगती बद्दल गौरव उद्गार काढले व शाळेची गुणवत्ता अशीच वाढवावी व शालेय स्वच्छतेबद्दल मुख्याध्यापक व शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळा यांचा पट वाढण्यास मदत होणार आहे या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच माननीय मौला साहेब गुलम्हमद मुलाणी श्री कुबेर शिंदे ग्रामपंचायत सदस्य दीपक घोडकोस ग्रामपंचायत सदस्य श्री शहाजी भाऊ लोकरे श्री राजकुमार यादव श्री शरद पवार श्री ज्योतीराम सरडे श्री संपत काका सरडे श्री बाबासाहेब यादव तसेच शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गौतमी गायकवाड व सर्व मुलांचे पालक मुख्याध्यापक श्री मुलाणी सिकंदर गफूर व शिक्षक श्री संजय केरू गोरवे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री साईनाथ देवकर साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले शेवटी श्री संजय किरुगर्वे उपशिक्षक यांनी सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रमाची सांगता केली




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा