Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १५ जून, २०२६

*अकलूज शहरास १७ जून पासून पाणीपुरवठा चार दिवसा आड होणार-- मुख्याधिकारी सचिन पाटील नगरपरिषद अकलूज*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


अकलूज शहरास  होणारा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाच्या पत्रा अन्वये चार दिवस आड होणार असल्याचे माहिती अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सचिन पाटील यांनी पत्राद्वारे कळवले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे क


अकलूज नगरपरिषद परिसरातील सर्व नागरीकांना कळविणेत येते की, पाटबंधारे विभागाकडील पत्रा अन्वये अकलूज नगरपरिषद साठवण तलावात पाटबंधारे विभागाकडुन पाणी उशिरा मिळणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी पुढील पाणी मिळेपर्यंत पुरवायचे आहे, तरी बुधवार दिनांक १७-०६-२०२६ पासुन पहिल्या भागात चार दिवसाआड एक वेळ सकाळी नियमित वेळे प्रमाणे पाणी पुरवठा केला जाईल. तसेच गुरुवार दिनांक १८-६-२०२६ पासुन दुस-या भागात चार दिवसाआड एक वेळ सकाळी नियमित वेळे प्रमाणे पाणी पुरवठा केला जाईल याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. तसेच उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून नगरपरिषदेस सहकार्य करावे.

तसेच अकलुज नगरपरिषद हद्दीतील सर्व पाणीपुरवठा कनेक्शन धारकांना सूचना सर्वांनी नळाला तोटी लावून घ्यावी. तोटी न लावणाऱ्या नळ धारकांचे नळ कनेक्शन त्वरित कट करण्यात येईल. तसेच नळाच्या पाण्याने गाडी धुणे, अंगणात व रस्त्यावर पाणी मारणे अथवा नळाचे पाणी नाली मध्ये सोडणे यासारख्या पाणी अपव्यय करण्याच्या गोष्टी केल्याचे निदर्शनास आल्यास सदर नळ कनेक्शन धारकाचे नळ कनेक्शन खंडित करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी.


(सचिन पाटील) मुख्याधिकारी गट-अ (निवडश्रेणी) अकलूज नगरपरिषद, अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा