*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते साजिद भाई सय्यद यांना परिवर्तनवादी पँथर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . असून हा सोहळ दिनांक 16/7/2026. रोजी सायंकाळी सहा वाजता दलित पॅंथरच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्ताने परिवर्तनवादी दलित पॅंथर पुरस्कार सामाजिक शैक्षणिक राजकीय उद्योग आर्थिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात आले याशिवाय समाजामध्ये अन्याय अत्याचारविरुद्ध जे लढा उभा करतात, समाजातील उपेक्षित वंचित शोषित घटकांना न्याय मिळवून देतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते साजिद भाई यांचा सिंहाचा वाटा आहे फार मोठ योगदान आहे . विद्यार्थी युवक महिला यांच्यासाठी त्यांनी फार मोठे कार्य केला आहे संकटामध्ये अडचणीमध्ये गोरगरिबांसाठी धावून जाणं त्यांना मदत करणे यामध्ये साजिद भाई सय्यद यांचे नाव परिसरामध्ये आदराने घेतले जातं त्यामुळे त्यांना परिवर्तनवादी पँथर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आणि लेखक नितीन चंदनशिवे,डॉक्टर श्रद्धा जवंजाळ, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईजे
सामाजिक कार्यकर्ते वैभव गीते, आरपीआय राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार बंडखोरचे संपादक गौतम भंडारी, नगरसेवक सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला .
यावेळी आई श्री रिसॉर्ट नवीन बस स्थानक जवळ संपूर्ण हॉल माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांची प्रचंड गर्दी दिसत होती .
*साजिद भाई सय्यद यांना परिवर्तनवादी पँथर्स पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल -संपादक, हुसेन मुलाणी" टाइम्स 45 न्यूज मराठी "*व समूहाच्या वतीने हार्दिक अभिनंदन*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा