*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
संघर्षमय जीवनातील अन्याय अत्याचाराला सामोरे जाऊन शोषित वंचित घटकांना न्याय दिल्याबद्दल अकलूज येथील युवा नेतृत्व राहुल ढेरे यांना परिवर्तनवादी पँथर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते नव्या पिढीतील लोकप्रिय युवा नेतृत्व माननीय श्री राहुल ढेरे यांनी समाजातील वंचित उपेक्षित शोषित घटकांना
न्याय मिळवून देऊन माळशिरस तालुक्यामध्ये युवाशक्ती मधील एक लोकप्रिय नेतृत्व जे स्वतः संघर्षमय जीवन जगले युवकांसमोर एक आदर्श ठेवत आहेत अशा नेतृत्वाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी व्याख्याते नितीन चंदनशिवे डॉक्टर श्रद्धा जंवजाळ, आरपीआयचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नंदकुमार केंगार जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, नगरसेवक नाशिक सोनवणे सामाजिक कार्यकर्ते वैभव गीते बंडखोरचे संपादक गौतम भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . हा सोहळा
. दिनांक 16 /7 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता आई श्री रिसॉर्ट अकलूज येथे भरगच्च हॉलमध्ये माळशिरस तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक आर्थिक उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
*राहुल ढेरे पाटील यांना परिवर्तनवादी पँथर्स पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल -संपादक, हुसेन मुलाणी" टाइम्स 45 न्यूज मराठी "*व समूहाच्या वतीने हार्दिक अभिनंदन*






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा