Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ जुलै, २०२६

*नशा मुक्त भारत मोहिमेला मोठा प्रतिसाद* *जिल्हाभरात अमली पदार्थ विरोधात राबविले विविध उपक्रम*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात नशा मुक्त भारत, मादक द्रव्य सेवन विरोधी पंधरवडा उत्साहात पार पडला. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्तविद्यमाने  जिल्हाभर अमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृती करण्यात  आली.



 तुळजापूर तालुक्यातील विविध शाळा मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ ही देण्यात आली. याचा एक भाग म्हणून आज दिनांक १/७/२०२६ roji हुतात्मा बाबुराव बोरगावकर हायस्कूल साखर कारखाना नळदुर्ग ता. तुळजापूर येथे विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवन  विरोधात मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक श्री नरवडे सर व शिक्षक वृंद आणि दोनशे विद्यार्थी उपस्थित होते            


      .या कार्यक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. नशा मुक्त भारत अभियानांतर्गत धाराशीव जिल्हा नशामुक्त करण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला आहे. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक तथा परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग चे संस्थापक सचिव,राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त प्रबोधनकार मारुती बनसोडे यांनी मार्गदर्शन केले आणि व्यसनमुक्तीची शपथ दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा