*श्रीपुर-- बी.टी.शिवशरण*
श्रीपूर मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य चौकात सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालय नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते या संदर्भात महाळुंग श्रीपूर नगरपंचायत कडे वारंवार मागणी केली असता नगरपंचायतचे पदाधिकारी सांगतात नगरपंचायत कडे पैसे शिल्लक नाहीत याचा निषेध म्हणून महाळुंगचे आरटीजीएस कार्यकर्ते रणजित नवगिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज श्रीपूर मध्ये भीक मागो आंदोलन केले रणजित नवगिरे यांनी आमदार अभिजित पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील या दोघांचे फोटो गळ्यात अडकवून श्रीपूरचे मुख्य रस्त्यावर हातात ताट घेऊन दोन रुपये भीक द्यावो म्हणत भीक मागितली व गोळा झालेले पैसे नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना देणार असल्याचे सांगितले श्रीपूर हे मोठं गाव झाले आहे मात्र कुठेही मुतारी नाही शौचालय नाही नागरीसुविधा नाहीत रस्त्यावर कचरा साचला आहे गटारी तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे याकडे कोणीही लक्ष देत नाही भीक मागो आंदोलन पहाण्यासाठी श्रीपूर मध्ये उत्सुकतेनं नागरिक रस्त्यावर येऊन भीक देत होते श्रीपूर मध्ये युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे मुतारी ची सोय नसल्याने नागरिक नाईलाजाने त्या पुतळ्याच्या लगतच लघुशंका करत असतात त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे याची जराही कोणत्या नगरसेवक नेते कार्यकर्ते यांना चाड नाही याची चिड म्हणून आज महाळुंगचे आरटीजीएस कार्यकर्ते रणजित नवगिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भीक मागितली त्यांच्या या भीक मागो आंदोलनाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या आंदोलनाला एकाही नगरसेवकाने नेत्यांनी दाद घेतली नाही एरवी शंभर कोटी चा निधी आणला आम्ही अमुक कामे करु तमुक विकास करु अशा फुकटच्या वल्गना करणारे सार्वजनिक मुतारी शौचालय बांधण्यासाठी मुग गिळून गप्प आहेत नवीन मुख्याधिकारी यांवर काय भूमिका घेतात याकडे लक्ष वेधले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा