Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ जुलै, २०२६

आनंद दरबार मध्ये रविवारी ५ जुलै रोजी लोकेशऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रवचनाबरोबरच त्यांचा जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन : अध्यक्ष बाळासाहेब धोका यांची माहिती.

 पुणे, डॉ. संदेश शहा.

शुक्रवार, ३ जुलै २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



पुणे कात्रज दत्तनगर

येथील आनंद दरबार संस्था येथे रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुदेव प्रवर्तक प. पू. श्री कल्याण ऋषीजी म. सा. यांचे सुशिष्य, प्रवचन प्रभाकर प. पू. श्री लोकेशऋषीजी म. सा. व दिवाकर ज्योती प. पू. जयश्रीजी म. सा., यांचे यानिमित्त धार्मिक प्रवचन होणार आहे. यावेळी प. पू. राजश्रीजी म. सा. आणि प. पू. समीक्षा श्रीजी म. सा. यांच्या पवित्र सान्निध्यात या प्रभावशाली गुरुवाणी  चा लाभ सर्वांना मिळणार आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आनंद दरबार चे प्रमुख बाळासाहेब धोका यांनी केले आहे.  

कार्यक्रमाची सुरुवात रविवारी सकाळी साडेआठ वाजता होणार असून दहा वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात  लोकेशऋषींजी महाराज व दिवाकर जोती पूज्य जयश्री जी महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन होणार आहे. त्यानंतर लोकेश ऋषीजी महाराज साहेब यांचा जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमानंतर  उपस्थितांना गौतम प्रसादी चा लाभ मिळणार आहे.

"आनंद दरबारात भक्तीचा रंग भरू दे, साधू-संतांच्या संदेशाने जीवन उजळू दे" या संदेशासह सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद दरबाराचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले आहे.  पूज्य लोकेशऋषीजी महाराज यांचा बंगलोर येथे धार्मिक परिवारा मधे जन्म झाला असून त्यांच्या वडिलांचे नाव भंवरलालजी बाठिया तर आईचे नाव कांताबाई असे आहे. त्यांना तीन भाऊ आहेत. आई ३५ वर्षापासून वर्षीतप करत आहेत तर वडिलांचे सकाळी प्रतिक्रमण प्रसंगी चार लोगस ध्यान करत असताना समाधि मरण झाले आहे. परमपूज्य  लोकेशऋषिजी महाराज साहेब यांनी दिनांक १९ मे १९९१ रोजी नाशिक मध्ये गुरुदेव प्रवर्तक कल्याण ऋषीजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली. गुरुदेव कल्याण ऋषीजी महाराज साहेब यांनी संथारा व्रत धारण केल्यानंतर ३४ दिवसांनी ९ फेब्रुवारी ९४ रोजी त्यांचे देवलोक गमन झाले. त्यानंतर त्यांनी पुज्य तारकऋषी महाराज यांच्या आज्ञेवरून हितेशऋषींजी व रसिकऋषींजी महाराज साहेब यांच्यासह विहार करत पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र मध्ये चातुर्मास केले. सन २०२६ चा  त्यांचा चातुर्मास पुणे सादडी सदन येथे होत आहे. त्यांचे देश परदेशात लाखो शिष्य असून त्यांच्या विद्यानगरी पुणे येथील चातुर्मासाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा