Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ जुलै, २०२६

हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अश्लील भाष्य करणाऱ्या नादिया इलाही खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी* करमाळा मुस्लिम समाज यांच्या वतीने पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदार यांना निवेदन

 करमाळा प्रतिनिधी अलीम शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-98506636830*


सोशल मीडियावर पैगंबर हजरत मुहम्मद (स.अ.) तसेच हजरत आयशा (र.अ.) यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत नादिया इलाही खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मक्का मशिद ट्रस्ट तसेच करमाळा मुस्लिम समाज बांधव यांच्या  वतीने करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नादिया इलाही खान यांनी सोशल मीडिया व इतर माध्यमांतून पैगंबर हजरत मुहम्मद (स.अ.) तसेच हजरत आयशा (र.अ.) यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्ये केली असून, त्यामुळे मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या कथित वक्तव्यांमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 


नादिया इलाई खान यांनी इस्लाम धर्माचे आद्य प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर तसेच हजरत आयेशा यांच्या बद्दल वैयक्तिक जीवनाबाबत मुस्लिम धर्माबाबत काल्पनिक बनावट अश्लील भाष्य करीत वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सदरचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे सदर व्हिडिओ मुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये तणाव निर्माण होईल असे भाष्य केलेले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून नादिया इलाही खान यांच्याविरोधात भारतीय कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी तसेच तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मक्का मशिद ट्रस्ट तसेच करमाळा मुस्लिम समाज बांधवांच्या  वतीने करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक हाजी अल्ताफ तांबोळी, यांच्या सहित मौलाना सिकंदर मुलाणी, मुफ्ती अबूरिहान कुरेशी, हाफिज सय्यद अली मौलाना वाजिद शेख, हाफिज अन्वर शेख, कादर मौलाना, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, माजी नगरसेवक फारूक जमादार, युवा नेते अमीर शेठ तांबोळी, जाकीर वस्ताद, आझाद शेख, जिशान कबीर, पत्रकार आलिम शेख सहित करमाळा शहरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते


चौकट घेणे 

मुस्लिम धर्मियांचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर तसेच हजरत आयेशा यांच्यावर अश्लील भाष्य करणाऱ्या नादिया खान या महिलेवर राज्य सरकारने त्वरित गुन्हा दाखल करावा अन्यथा या विरोधात आम्हा मुस्लिम बांधवांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा मुस्लिम समाजाचे नेते तसेच मा. नगरसेवक अल्ताफ तांबोळी यांनी बोलताना दिला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा