*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज आगाराचे आगार व्यवस्थापक श्री प्रमोदजी शिंदे यांनी तीन वर्षांमध्ये अकलूज
आगाराचे नाव राज्य परिवहन महामंडळाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने नोंद करून ठेवली तो प्रसंग म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान स्पर्धेत 250 आगारातून अकलूज आगाराला पहिल्या वर्षी पाच लाखाचे बक्षीस मिळाले दुसऱ्या वर्षी तीन लाखाचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले अकलूज बस स्थानकात आदर्श प्रशासकीय अधिकारी लोकसभागातून कर्मचाऱ्यांच्या सहभागातून सर्वांना बरोबर घेऊन एखाद्या संस्थेचा किती कायापालट करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आगारव्यवस्थापक माननीय श्री प्रमोद शिंदे साहेब होय
अकलूज आगारांमध्ये वृक्षारोपण, बगीच्या, लहान मुलांसाठी झोके, घसरगुंडी, तसेच प्रवाशांच्या विरंगुळ्यासाठी त्यांना हिरव्यागार झाडांच्या सहवासात रमता यावे बाकडांची निर्मिती, आरोग्यासाठी आरोग्यदायी असा ऑक्सिजन पार्क निर्माण करून कल्पकता सर्जनशीलता यांचे त्यांनी दर्शन घडवले
अकलूज आगारात शिस्त कर्तव्य आणि उत्पन्न वाढीमध्ये यश संपादन करताना त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्येने या भागातील प्रवासी वर्ग लाल परी कडे वळविले .
आदरणीय आगार व्यवस्थापक शिंदे साहेब प्रवाशांमध्ये एकरूप होण्यासाठी प्रवाशामध्ये जाऊन मिसळत असत त्यांच्याशी संवाद करत असत आणि आपल्याला कुठे सुधारणा करता येईल याचा त्यांना मार्ग सापडत असे एक अत्यंत नम्र शील संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी तळमळ असणारे प्रशासकीय अधिकारी म्हणजे शिंदे साहेब .
. विद्यार्थी युवक प्रवासी यांच्यासाठी त्यांनी बस स्थानकावर एक ग्रंथालय सुरू केले आहे .
एक जून 1948 पासून राज्य परिवहन महामंडळातप्रवाशांच्या सेवेसाठी जेवढ्या बस गाड्या दाखल झाल्या त्या सर्व बस गाड्यांचा संग्रह फक्त अकलूज आगारातच पाहायला मिळतो .
अकलूज हे गाव महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते परंतु या तीन वर्षात अकलूज आगाराला पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक बस स्थानकावर येतात पर्यटक आमच्या जवळच विचार व्यक्त करतात "असे स्वच्छ सुंदर बस स्थानक महाराष्ट्र मध्ये नाही ."
स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानात सलग दोन वर्षे बक्षीस मिळवून देणारे महाराष्ट्रातील एकमेव आगार व्यस्थापक, फुल झाडांची लागवड करणारे, झाडांचे देखभालीसाठी स्वता काम करणारे , प्रवासी बंधू भगिनींसाठी बस स्थानकावर मनोरंजन व्हावे यासाठी एफएम द्वारे पहाटेपासून भक्ती गीते भावगीते सुरू असतात .
उत्पन्न वाढ इंधन बचत यावर विशेष लक्ष देऊन वेळेचे अचूक नियोजन करून अकलूज आगाराला त्यांनी नेहमी प्रथम क्रमांक उत्पन्नात मिळवून दिला आहे .
शाळा महाविद्यालयापेक्षा महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम अकलूज आगारात होतात . भव्य दिव्य होतात याचे सर्व श्रेय माननीय शिंदे साहेबांचे . नवरात्र उत्सव माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उत्साहात तीन वर्षे संपन्न झाला
अकलूज आगाराला यापूर्वी ग्रामपंचायतीकडून बक्षीसे सुद्धा मिळाले आहेत .
गुगल द्वारे स्कॅन करून प्रवाशांना वेळापत्रक देण्याची व्यवस्था सुद्धा आदरणीय शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिली आहे .
एक आदर्श प्रशासकीय अधिकारी स्वतःच्या तळमळीने,जिद्दीने,अथक परिश्रमाने स्वतःचे जीवन वाहून घेतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय आगार व्यवस्थापक शिंदे साहेब .
आदरणीय शिंदे साहेबांना भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच अकलूज आगारातील सर्व कामगारांच्या वतीने अंतकरणापासून शुभेच्छा
अकलूज आगारात आज. नव नियुक्त झालेले आदरणीय आगार व्यवस्थापक मा . श्री पोपळे साहेब यांनाही सर्व कामगारांच्या वतीने शुभेच्छा देतो .





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा