Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ जुलै, २०२६

बावडा येथील भाग्यश्री अंकुश घाडगे यांनी रांगोळीतून संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमनाची प्रतिकृती हुबेहुब साकारली

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



----- जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त बावडा येथील भाग्यश्री अंकुश घाडगे यांनी रांगोळीतून संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन याची प्रतिकृती हुबेहुब साकारली. या भाविक आविष्काराला रेखाटण्यासाठी १० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला, अकरा तासांच्या मेहनतीनंतर सदरची प्रतिकृती साकारली. संस्थानच्या विश्वस्तांनी रांगोळीला भेट देऊन त्याची पाहणी केली.


जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त भानुदास महाराज मोरे, भानुदास शेठ खांदवे, पैलवान प्रशांत शेडगे, गौरव साखरे, रवी काळभोर, मधुकर महाराज सोमवंशी यांनी भाग्यश्री घाडगे यांच्या रांगोळीला भेट देऊन त्यांचे कौतुक करत सत्कार केला. यावेळी घाडगे परिवाराच्या वतीने अंकुश घाडगे यांनी वरील मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी महादेवराव घाडगे (संचालक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना अकलूज), शंकर घाडगे, रणजित घाडगे, अभिजित घाडगे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा