*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा दिवसभराच्या प्रवासानंतर पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्कामी पावसाच्या सरी झेलत सराटी येथे सायंकाळी पोहोचताच ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करून तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पादुकांची समाज आरती समीर तांबोळी यांच्या हस्ते झाल्यानंतर दर्शनासाठी भाविक व नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर येथील मुक्काम आटोपून सकाळी पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्काम सराटीकडे मार्गस्थ झाली. इंदापूर अकलूज मार्गाने सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर वाटेतील गावामध्ये जागोजागी पालखी सोहळ्याचे स्वागत व दर्शनासाठी भाविक व नागरिकांनी गर्दी केली होती. बावडा येथील दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा सायंकाळी पाच वाजता सराटीकडे मार्गस्थ झाला. बावडा ग्रामस्थ यांच्यावतीने पावसाच्या सरीत पालखी सोहळ्याला निरोप देण्यात आला.
सराटी येथे पालखीचे सायंकाळी सात वाजता आगमन होताच वेशीवर ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी फटाके व तोफांची सलामी देण्यात आली. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीतून आणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये समाज आरती करण्यात आली. तसेच सराटी पंचक्रोशी व परिसरातील भाविक व नागरिकांसाठी पादुका दर्शनासाठी मोठ्या रांगा लावण्यात आले.
पालखी सोहळ्यासमवेत तहसीलदार जिवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्यासह तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर महसूल, पोलीस, ग्रामविकास व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सराटी ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांना तसेच पोलीस, महसूल, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जेवणाची सोय करण्यात आली आहे. पावसाच्या पाश्र्वभूमीवर जर्मन सुपर स्ट्रक्चर वाटरप्रुफ भव्यदिव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.
चौकट - जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा दिवसभराच्या प्रवासानंतर पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्कामी पावसाच्या सरी झेलत सराटी येथे सायंकाळी सात वाजता विसावला. उद्या सकाळी पादुकांच्या निरास्नानानंतर सोहळा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावाकडे मार्गस्थ होणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर पालखीच्या स्वागतासाठी भव्य दिव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली आहे.
फोटो - सराटी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पादुकांची समाज आरती जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आली.
-----------------------------------------------------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा