*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
प्राणीशास्त्र विषयातील उल्लेखनीय संशोधनाबद्दल चैताली श्रीराम बोंगाळे-भस्मे यांना छत्रपती शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर कडून विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.
त्यांनी "उंदराच्या पचनसंस्था व रक्ताभिसरण संस्थेवर आयोनिक द्रव्यांच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास" या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. या संशोधनात उंदीर या प्रायोगिक प्राणिमॉडेलवर आयोनिक द्रव्यांचा (आयोनिक लिक्विडचा) पचनसंस्था व रक्ताभिसरण संस्थेवर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
हरित रसायनशास्त्र (ग्रीन केमिस्ट्री) आणि रासायनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात असून, पर्यावरणपूरक रासायनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्याचा उपयोग होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांना प्रा.नितीन कांबळे, प्रा.गजानन राशीनकर यांचे मार्गदर्शन लाभले.
चैताली श्रीराम बोंगाळे-भस्मे यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील संशोधन वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा