Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ जुलै, २०२६

उजनी धरणातून भिमा नदीत ६१ हजार क्वियुसेक्सचा विसर्ग, नदी काठावर शेतकऱ्यांची साहित्य काढण्याची गडबड, उजनी धरण 100 टक्के भरले.

*कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


       पुणे परीसर व घाट माथ्यावर  झालेल्या अतिवृष्टीमुळे वरील धरणातून ५८ हजार क्यूसेक्स पाणी दौंड मधून उजनीत येत आहे. धरण १०० टक्के भरल्याने पुरनियंत्रणेच्या दृष्टीने उजनी धरणातून भिमा नदीत ६१ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. त्यामुळे भिमा नदीवरील तीनही बंधारेना पाणी लागले आहे. तर वीरमधून नीरा नदीत २५ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठावरील इंदापूर, माढा व माळशिरस तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नरसिंहपूर येथील संगमावर ८६ हजार क्युसेक्सचा विसर्ग वाहत आहे




     पुणे परिसर, घाट माथ्यावर व जिल्ह्यात तुफान पर्जन्यवृष्टीमुळे वरील सर्वच धरणातून ५८ हजार क्युसेक्स पाणी दौंड येथून उजनीत येत आहे. धरण शंभर टक्के भरल्याने पुरनियंत्रणाच्या दृष्टीकोनातून उजनी धरणातून भिमा नदीत काल सहा हजाराने सोडले जाणारे पाणी रात्री साडेआठ वाजता ३० हजाराने नंतर ६१ हजाराने सोडले जात असल्याचे उजनी धरण नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे. 

     उजनी धरणातून भीमा नदीत सतत पणाने कमी जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामध्ये आज वरील सर्व धरणातून ५८ हजार पेक्षा जास्तीचे पाणी उजनीत येत असल्याने उजनी धरणाच्या साठ्यात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पुरनियंत्रणाच्या दृष्टीकोनातून भिमा नदीत ६१ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे. पावसाची परिस्थिती जर अशीच राहिली तर पाण्यात वाढ करण्यात येणार असल्याचे उजनी धरण प्रशासनाने नदी काठावरील शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

     उजनी धरणातून भिमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे भांडगाव, टणू, नरसिंहपूर येथील बंधारेना पाणी लागले आहे. गणेशवाडी - गारअकोले यांना जोडणारा पुलाला पाणी चिकटण्यासाठी दोन फूट कमी असल्याचे दिसले. 

     वीर धरणातून नीरा नदीत २५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. त्यामुळे भीमा व नीरा नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. नरसिंहपूर येथील संगमावर ८६ हजार क्युसेक्सचा विसर्ग वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असा इशारा जलसंपदा विभाग सोलापूर, धरण नियंत्रण विभाग भिमानगर, धरण नियंत्रण विभाग निरा खोरे - विर धरण व उजनी पूर नियंत्रण विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

      नरसिंहपूर संगम व नरसिंहपूर शेवरे पुलावरून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. कोंडारपट्ट्यातील गावातील विद्यार्थ्यांना गणेशवाडी पुलावरील वाहतूक सध्याला सुरळीत सुरू आहे. नदी काठावरील शेतातील पिकात पाणी घुसल्याने केळी, ऊस, मका पिके पाण्याखाली गेली आहेत.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा