Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ९ जुलै, २०२६

*अकलूज येथील जुने एसटी स्टँड वरील सुलभ शौचालय पाण्याअभावी बंद?*


 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*



अकलूज येथील जुने एसटी स्टँड वर असलेले सुलभ शौचालय पाण्याअभावी बंद असल्याचे बोलले जात आहे त्याबाबत सविस्तर माहिती अशी की अकलूज हे बाजारपेठेचे गाव असून अकलूज परिसर आणि तालुक्यातील नागरिक आणि प्रवासी अकलूजला दररोज येत असतात त्यामध्ये महिला नागरिक व प्रवासी ही असतात जुने एसटी स्टँड वरील सुलभ शौचालय मुळे महिलांची सोय होत होती मात्र काल दि.८/७/२६ पासून हे सुलभ सौचालय पाण्याअभावी बंद करण्यात आल्याचे समजते?



     विशेष म्हणजे कुठल्याही एसटी स्टँडवर महिलांना लघु शंका अथवा शौचा साठी पैसे आकारले जात नसताना सुद्धा अकलूज येथील जुन्या एसटी स्टँडवर महिलांकडून पैसे आकारले जातात अशी तक्रार वारंवार होत असते त्या संदर्भात आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली असता जुजबी उत्तर देऊन त्याला समज देतात मात्र "पहिला पाडा पंचावन्न "याप्रमाणे परत तो सुलभ शौचालय वाला महिलांकडून पैसे आकारतो अशी महिला वर्गातून बोलले जात आहे!

    विशेषता अकलूज नगर परिषद हे निवड  गट अ श्रेणीत असताना सुद्धा नगर परिषदेची सार्वजनिक मुतारी अथवा शौचालय बाजारपेठेत कुठेही निदर्शनास येत नाही 

    विशेषता नगरपरिषदेचे शॉपिंग सेंटर आहे तेथे शौचालय असणे बंधनकारक असताना सुद्धा केवळ नगर परिषदेच्या नियोजन अभावी महिलांना याबाबत त्रास सहन करावा लागत आहे ही दुर्दैवी बाब आहेअकलूज परिसरातील महिला वर्ग खरेदीसाठी अकलूजला आले तर विजय चौक, शिवापुर पेठ, जुनी एसटी स्टँड सदाभाऊ चौक, गांधी चौक इत्यादी ठिकाणी कोठेही सुलभ शौचालय नसल्याने गैरसोय होत आहे मात्र इतके दिवस जुने एसटी स्टँड वर सुलभ शौचालय असल्याने त्यांची  सोय होत होती तेही बंद झाल्याने महिलांची गैरसोय होत असल्याचे महिला नागरिकांनी प्रवाशातून बोलले जात आहे

     पुरुषांना लघु शंका आली तर ते कोठेही आडोशाला लघु शंका करू शकतात मात्र महिलांसाठी ही मोठी अडचण आहे याचा विचार होणे गरजेचे आहे स्वच्छ अकलूज सुंदर अकलूज म्हणून जाहिरात बाजी करणाऱ्या अकलूज  नगर परिषदेने या ब्रिद वाक्याला "गैरसोईचे अकलूज आणि अस्वच्छ अकलूज" म्हणण्याची वेळ आणली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा