Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ९ जुलै, २०२६

*एमआयडीसीतील कंपन्यांना बेकायदेशीरपणे त्रास दिल्यास गुन्हे दाखल होणार.. शिक्रापूर पोलिसांचा इशारा* _दादागिरी करून पैसे मागितल्यास खंडणीचे गुन्हे दाखल होणार; शिक्रापूर पोलीस निरीक्षक यांचा इशारा_

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



-----  शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने शुक्रवारी (दि.३) रोजी शिक्रापूर एमआयडीसीतील विविध कंपन्यांचे एचआर मॅनेजर व प्रतिनिधी यांची समन्वय बैठक घेण्यात आली. उद्योगांना सुरक्षित, भयमुक्त आणि कायद्याचे संरक्षण असलेले वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

        बैठकीत कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, सुरक्षा व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. औद्योगिक वसाहतीमध्ये लेबर, स्क्रॅप, ट्रान्सपोर्ट, केटरिंग, सिक्युरिटी, हाऊसकिपिंग, पाणी टँकर किंवा इतर कोणत्याही कामांचे ठेके मिळवून देण्याच्या नावाखाली कोणीही व्यक्ती अथवा संघटना बेकायदेशीर दबाव टाकत असेल, पैसे किंवा खंडणीची मागणी करत असेल, दमदाटी अथवा धमक्या देत असेल, तर त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले. अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये संबंधितांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा शिक्रापूर पोलिसांनी दिला.

यावेळी एमआयडीसी परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, कंपनी परिसरात नियमित पोलीस पेट्रोलिंग वाढविणे, वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी नियोजन, कामगारांची लुटमार रोखण्यासाठी विशेष लक्ष देणे, तसेच परप्रांतीय कामगारांची संपूर्ण माहिती व नोंदी कंपन्यांनी अद्ययावत ठेवाव्यात, याबाबतही सविस्तर चर्चा झाली. उद्योग-व्यवसाय सुरळीत आणि सुरक्षितपणे सुरू राहण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनकडून २४ तास आवश्यक ते सहकार्य व संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही बैठकीत देण्यात आली. तसेच कोणतीही संशयास्पद घटना अथवा बेकायदेशीर प्रकार निदर्शनास येताच विलंब न करता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीतील या भूमिकेचे उपस्थित कंपनी प्रतिनिधींनी स्वागत करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले. उद्योग आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी अशा बैठका नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी क्रोम वेल इंजीनियरिंग चे नीलेश गव्हाणे, संदीप दिवेकर जॉन डीअर चे राम अहिरे, अलिकॉन च्या श्रीमती जाधव, हर्ष ओगल चे मारुती पाटील, मॅक अल्टी चे असलम परवेज व इतर यांनी आपल्या समस्या मांडल्या.

यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले हनुमंत गिरी उपनिरीक्षक तुषार भोर गोपनीय अंमलदार संदीप कारंडे बापू जगताप हे हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा