*अकलूज प्रतिनिधी*
*केदार. लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त जैन सोशल ग्रुप अकलूजच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.भगवान महावीर पथ येथे आयोजित या उपक्रमांतून वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांचा विचार करत १००० पेक्षा अधिक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर राजकुमार फडे यांच्या सहकार्याने २,००० एनर्जी ड्रिंकचे वाटप करण्यात आले.
तसेच संकेत बाहुबली गांधी यांच्या सौजन्याने वारकऱ्यांना दंतमंजनाचे वितरण करण्यात आले.या उपक्रमाला वारकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
त्याच बरोबर "स्वच्छ अकलूज – सुंदर अकलूज" या सामाजिक अभियानांतर्गत पालखी मार्गावरील व गर्दीच्या विविध ठिकाणी कचरा पेट्या (डस्टबिन) ठेवण्यात आल्या. त्यामुळे कचरा इतरत्र विखुरला जाणार नाही आणि परिसर स्वच्छ राहण्यास मोठी मदत झाली.या उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन नागरिक व वारकरी यांच्या कडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.वारकऱ्यांची सेवा, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देणारे हे उपक्रम जैन सोशल ग्रुप अकलूजच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले असून या अभिनव कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.या उपक्रमाची माहिती अध्यक्ष सी.ए.अमित दोशी व सचिव गौरव फडे यांनी दिली.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा