Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ जुलै, २०२६

इंदापूर 'आयएमए'च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते येथे सन्मान

 इंदापूर, डॉ. संदेश शहा. 

सोमवार, ६ जुलै २०२६

टाईम्स 45 न्यूज मराठी 

मो.  ९९२२४१९१५९



राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा इंदापूर येथे भाग्यश्री बंगलो येथे सन्मान करण्यात आला. 

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अभिजित ठोंबरे व नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचा सन्मान करत हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांना विधान गाथा हे पुस्तक भेट दिले. 

याप्रसंगी हर्षवर्धन पाटील म्हणाले, डॉक्टर हे देवदूत असून इंदापूर आयएमए चे वैद्यकीय क्षेत्रात चांगले कार्य आहे. त्यांनी सामाजिक कार्याचे राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळवले आहेत. 

आयएमए ने आरोग्य जनजागृती बरोबरच विविध प्रकारचे कॅन्सर, मधुमेह आदी विकारावर प्रतिबंधात्मक कार्य करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. रुग्णांना जास्तीजास्त चांगली आरोग्य सुविधा इंदापूर मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आयएमए ला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सत्कारमूर्ती नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अभिजित ठोंबरे म्हणाले, इंदापूर 'आयएमए'च्या माध्यमातून तालुक्यामध्ये सामाजिक उपक्रम आणि मोफत विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल.

​यावेळी आयएमएचे नूतन संचालक मंडळ तसेच डॉ. अविनाश पाणबुडे, डॉ. संजय शहा, डॉ. राजेंद्र शिंदे, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. लक्ष्मण सपकळ, डॉ. अर्जुन नरुटे यांचेसह तालुक्यातील मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.

डॉक्टर्स डे निमित्त यावेळी आयएमए च्या डॉ. नि. तू. मांडके सभागृहात ज्येष्ठ डॉक्टरांचा वैद्यकीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश आयएमए चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. राम आरणकर तसेच इंदापूर आयएमए चे मावळते अध्यक्ष डॉ. अनिल शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडण्यात आलेली नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.

​अध्यक्ष : डॉ. अभिजीत ठोंबरे, पुढील वर्षाच्या ​अध्यक्षा : डॉ. शुभांगी शिंदे​. उपाध्यक्ष : डॉ. शिवाजीराव खबाले व डॉ. ऋषिकेश गार्डे.

​सचिव : डॉ. अतुल वणवे. ​सहसचिव : डॉ. सचिन बिचुकले.

​खजिनदार : डॉ. महेश रुपनवर. ​आयएमए महिला डॉक्टर विंग :

​अध्यक्षा : डॉ. कल्पना खाडे. ​समिती सदस्य: डॉ. सविता पोमणे -चित्रकोटी, डॉ. कोमल गार्डे.

​विविध समित्यांचे प्रमुख : ​शैक्षणिक आणि वैज्ञानिक विभाग : डॉ. रोहित कांडलकर.

​क्रीडा समिती : डॉ. सागर दोशी.

​सांस्कृतिक समिती : डॉ. रोहिदास थोरवे, डॉ. नुपूर कदम

​सोशल मीडिया आणि जनसंपर्क समिती : डॉ. अमोल रासकर.

​आयएमए प्रकल्प समिती : डॉ. अमोल खानावरे.

​वैद्यकीय - कायदेशीर समिती : डॉ. नितीन लोंढे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा