उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
सभेचा उत्साह; नवीन पालक संघाची बिनविरोध निवड
लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेली पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शाळा यांच्यात अधिक सुसंवाद आणि सहकार्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या सभेत नवीन पालक संघाची बिनविरोध निवड करण्यात आली.
यामध्ये योगेश सिताराम शेंडगे यांची पालक संघ अध्यक्षपदी, तर सोमनाथ चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच महिला पालक संघाच्या अध्यक्षपदी निकिता मोरे यांची, तर उपाध्यक्षा म्हणून शीतल भुजबळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित पालक, शिक्षक व मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले मनोगत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, "विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिकच नव्हे, तर बौद्धिक, नैतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकास घडविण्यासाठी शाळा व पालकांनी एकत्रितपणे कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण असलेली पिढी घडविण्यासाठी पालकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे."
तसेच त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत, पालकांच्या सहकार्यामुळे फिनिक्स स्कूलची शैक्षणिक वाटचाल अधिक बळकट होईल आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवीन दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा