Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ जुलै, २०२६

*महर्षि संकुलात वारकऱ्यांच्या हस्ते रुजला हरित महाराष्ट्राचा संकल्प; एक लाख सीडबॉलचे वाटप*

 *यशवंतनगर प्रतिनिधी*

*नाझिया  मुल्ला*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


शिक्षण प्रसारक मंडळ,v अकलूज संचलित महर्षि संकुल, यशवंतनगर अंतर्गत महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.              महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार एक लाख सीडबॉल तयार करून आषाढी वारीतील जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना त्यांचे वाटप करण्यात आले.


         "हाती टाळ, मुखी विठ्ठल आणि ओंजळीत हरित भविष्य" या भावनेतून साकारलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करणारा ठरला. प्रत्येक सीडबॉल म्हणजे भविष्यातील एका वृक्षाचे बीज असून, वारकऱ्यांनी प्रवासादरम्यान मोकळ्या जागेत तो टाकल्यास पावसाच्या पाण्याने त्यातून वृक्ष उगवण्याची संकल्पना आहे. वारीच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत हरित महाराष्ट्राचा संदेश पोहोचविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.

    या सीडबॉल संकल्पनेला प्रेरणा व दिशा देण्याचे कार्य मा. श्री. सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सोलापूर यांनी केले. त्यांच्या पर्यावरणप्रेमी आणि दूरदृष्टीपूर्ण विचारातून साकारलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शिक्षणाबरोबरच निसर्गसंवर्धनाची जबाबदारी समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रेरणादायी संदेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

     या उपक्रमाचा शुभारंभ मा. श्री. सचिन जगताप (शिक्षणाधिकारी, माध्यमिक, सोलापूर), श्री. संजय गळीतकर (मुख्याध्यापक) व सौ. अनिता पवार (मुख्याध्यापिका) यांच्या हस्ते करण्यात आला.              यावेळी वारकऱ्यांना नवभारत साक्षरता अभियानाची माहिती देऊन निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

        पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि साक्षरतेचा संदेश एकाच वेळी जनमानसात रुजविणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थित वारकरी, नागरिक व मान्यवरांनी मनापासून कौतुक केले. "एक वारकरी – एक सीडबॉल, एक सीडबॉल – एक वृक्ष, एक वृक्ष – हरित भारत" हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.

   सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर दुपडे व नाझिया मुल्ला यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा