Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ जुलै, २०२६

*आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व मंत्री गोगावले यांची भेट, विकासकामांची केली मागणी*

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

 *आलिम शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी आज एकाच दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली. याभेटी दरम्यान आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील सीना नदीवर एका मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी १६ कोटी ९४ लाख रुपये निधी मागितला.         



                            करमाळा-बोरगाव-घारगाव प्रजिमा ५ यावर सीना नदी ओलांडून जाताना पुलाच्या बांधकामासाठी निधी मागितला आहे. संगोबा येथील नदीवर जलसंपदा विभागाच्या बंधाऱ्यावरुन नागरिकांना येजा करावी लागते. येथे पुल बांधल्याने करमाळा तालुक्यातील बारा गांवांचा संपर्क हा करमाळा तालुक्यातील इतर गावांशी होईल. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे या बारा गावांचा पुल नसल्याने तालूक्याशी असलेला संपर्क तुटला होता. यावेळी पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार हे स्वतः करमाळा मतदार संघातील या ठिकाणी आले होते व याb पुलाचे काम करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले होते याची आठवण आमदार नारायण आबा पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना करुन दिली.                                                           



. यामुळे आता या पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. तसेच आमदार नारायण आबा पाटील यांनी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी करमाळा मतदार संघातील पाणंद रस्त्यांच्या कामासाठी निधी मागितला. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मातोश्री पानंद योजना ८५-१५ या योजनेतुन करमाळा मतदार संघातील सुमारे ५० किमी रस्त्यासाठी निधी देतो असे आश्वासन आमदार नारायण आबा पाटील यांना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा