Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ जुलै, २०२६

लवंग चे माजी सरपंच निशांत पाटील यांच्याकडून वारकऱ्यांसाठी काजू बदाम सफरचंद वाटप.

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी


आषाढी वारीच्या निमित्ताने लवंग परिसरात सेवाभावाचे सुंदर दर्शन घडले. गावातील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी वडापाव, पोहे, लाडू, जिलेबी, लस्सी आणि चहाचे वाटप करून विठ्ठलभक्तांची मनोभावे सेवा केली.


"वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची पूजा" या भावनेतून अनेकांनी स्वयंप्रेरणेने या उपक्रमात सहभाग घेतला.लवंग चे माजी सरपंच निशांत पाटील व सरपंच प्रशांत पाटील यांनी वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून काजू बदाम व सफरचंद ,पाण्याच्या बॉटल्स चे भक्तीभावाने वाटप केले.   रणजित चव्हाण मित्र मंडळाने हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला .  दिंडीतील वारकऱ्यांनी ग्रामस्थांच्या या प्रेमळ आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

वारीच्या मार्गावर सर्वत्र भक्ती, सेवाभाव आणि सामाजिक एकतेचे वातावरण निर्माण झाले असून, लवंग ग्रामस्थांनी जपलेली ही सेवा परंपरा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा