Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ जुलै, २०२६

*वडशिवणे ता. करमाळा येथील गोरख मारुती पारखे यांची अजित दादा पवार विद्यालय घ्या. शिक्षण सेवक पदावर केलेली नियुक्ती नियमबाह्य असल्याने रद्द. --शिक्षण उपसंचालक पुणे विभाग, पुणे यांचा आदेश*

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-9730867448*

 

*वडशिवणे ता. करमाळा येथील गोरख मारुती पारखे यांची अजित दादा पवार विद्यालय घ्या. शिक्षण सेवक पदावर केलेली नियुक्ती नियमबाह्य असल्याने रद्द केले असल्याचे पत्र शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांना दिलेल्या पत्रात नमूद केले असून यामुळे करमाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत शिक्षणाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या पत्रात दिलेली सविस्तर माहिती अशी की,


शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर

विषय : राजश्री शिव छत्रपती युवक संघटना, केम, ता. करमाळा, जि. सोलापूर या संस्थेच्या सचिव यांनी स्वतःचा मुलगा गोरख पारखेची बेकायदेशीर नेमणूक रद्द करणे बाब

पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धनंजय मच्छिंद्र नागणे व शारदाताई गोविंदराव पवार विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक वैजिनाथ इंगळे यांनी पंधरा दिवस आंदोलन केले होते पंधरा दिवसाच्या आंदोलनानंतर हे आदेश काढण्यात आले आहेत 


सदर्भ : मा.सदस्य सचिव (SIT) तथा शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन), शिक्षण आयुक्तालय, म.रा.पुणे यांचेकडील पत्र क्र. शिआ/स्विस/एसआयटी/२०२५/तक्रार, दिनांक ८.९.२०२५




उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय पत्रानुसार श्री.धनंजय मच्छिंद्र नागणे, अजित दादा पवार विद्यालय, वडशिवणे, ता. करमाळा, सोलापूर यांनी राजश्री शिव छत्रपती युवक संघटना, केम, ता. करमाळा, जि. सोलापूर या संस्थेच्या सचिव यांनी स्वतःचा मुलगा गोरख पारखेची यांची दि ०१.०६.२०१५ पासून केलेली बेकायदेशीर नेमणूक रद्द करणेबाबत केलेल्या तक्रारी सर्व




 संबंधितास त्यांचेकडील उपलब्ध सर्व कागदपत्र सादर करण्याची संधी देण्यासाठी दि १६.१०.२०२५ व दि २८.१०.२०२५ विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे यांचे दालनात कागदपत्र पडताळणी करीता बोलविण्यात आले होते.



सदर सुनावणी दरम्यान उपस्थितांनी माडलेले म्हणणे व सादर केलेले अभिलेखे पाहता खालील- श्री. गोरख मारुती पारखे यांची शैक्षणिक अर्हता एम एस्सी बी एड असून त्यांची खुल्या प्रवर्गातून दि ०१.०६.२०१५ पासून शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली असून, त्यांच्या नियुक्तीस शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांनी दि १४.०३.२०२२ च्या आदेशान्वये मान्यता दिलेली आहे. तथापि श्री. पारखे यांच्यापूर्वी सदर शाळेत बी एस्सी बी एड अर्हता असलेले एकूण ०५ शिक्षक असताना, म्हणजेच विषयाचा कार्यभार नसताना नेमणूक केल्याचे दिसून येते.                        


                   श्री. पारखे यांची नियुक्ती कोणाच्या रिक्त पदावर केली याचा पुरावा सादर करण्यात आलेला नाही. तसेच श्री. पारखे यांची नियुक्ती शाळेच्या दिर्घ कालीन सुट्टीच्या कालावधीत केल्याचे दिसून येते. मा. सहाय्यक आयुक्त मावक, पुणे यांनी दि ०९.०२.२०१९ रोजी तपासलेल्या बिंदूनामावलीनुसार मान्य पदे १८ असून कार्यरत १६ पदे आहेत. मा. मावक, कक्ष, पुणे यांनी तपासलेल्या बिंदूनामावलीनुसार अजा-१, अज-१ व भज-ब-१, असा ०३ पदांचा अनुशेष असून ०२ पदे रिक्त आहेत. श्री. पारखे यांची नियुक्ती आरक्षण धोरणांचे पालन न करता शासन निर्णय दि २४.०८.२०१८ चा चुकीचा अर्थ लावून वैयक्तिक मान्यता दिल्याचे दिसून येते.


श्री. पारखे गोरख मारुती यांची नियुक्ती विषयाचा कार्यभार नसताना करणे, रिक्त पदाचा पुरावा नसणे, आरक्षण धोरणाचे पालन न करता खुल्या प्रवर्गातून करणे, दिर्घकालीन सुट्टीच्या कालावधीत नियुक्ती करणे, शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावणे इ. कारणामुळे श्री. पारखे गोरख मारुती यांची वैयक्तिक मान्यता अनियमितता करुन दिलेली आहे. त्यामुळे शासन निर्णय दिनांक २३.८.२०१७ च्या तरतूदीनुसार श्री. पारखे गोरख मारुती यांची नियमबाहय वैयक्तिक मान्यता रद्द करण्यात येत आहे.

तरी याबाबत शासन निर्णय दिनांक ३० जानेवारी, २०२६ नुसार आपल्यास्तरावरुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

09/07.2016 (डॉ. गणपत मोरे) शिक्षण उपसंचालक पुणे विभाग, पुणे





अधिक माहिती स्तव 

प्रत : माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव खालील मान्यवरांना रवाना. केले आहे

१. अध्यक्ष/सचिव, राजश्री शिव छत्रपती युवक संघटना, केम, ता. करमाळा, जि. सोलापूर

२. मुख्याध्यापक, शारदाताई गोविंदराव पवार विद्यालय, केम, ता. करमाळा, जि.य सोलापूर

व. श्री. धनंजय मच्छिंद्र नागणे, अजित दादा पवार विद्यालय, वडशिवणे, ता. करमाळा, सोलापूर

४. श्री. पारखे गोरख मारुती, शारदाताई गोविंदराव पवार विद्यालय, केम, ता. करमाळा, जि. सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा