*उमरगा प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
NEET परीक्षेतील विद्यार्थ्यांवरील अन्याय, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार, दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जाचा निषेध तसेच शिक्षणातील बाजरीकरण व नोकऱ्यांतील खाजगीकरण थांबवावे या प्रमुख मागण्यांसाठी आज उमरगा येथे जिजाऊ ब्रिगेड, ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, साऊ एकल महिला समिती तसेच विविध समविचारी सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शांतता मोर्चा व प्रतीकात्मक उपोषण आंदोलन उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
सकाळी हुतात्मा स्मारक, उमरगा येथून मोर्चाला प्रारंभ झाला. आंदोलनकर्त्यांनी हातात विविध फलक घेत शिक्षणातील
पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि पेपरफुटीविरोधी घोषणा देत शहरातून शांततेत मार्गक्रमण केले. हा मोर्चा नगर परिषद, उमरगा समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला.
यावेळी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित सभेत विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे उद्ध्वस्त होणारे भविष्य आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
वक्त्यांनी सांगितले की, देशातील लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे परिश्रम करून परीक्षा देत असताना काही मोजक्या भ्रष्ट प्रवृत्ती संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळे ही केवळ प्रशासकीय चूक नसून देशाच्या गुणवत्ताधिष्ठित व्यवस्थेवर झालेला गंभीर आघात आहे. शिक्षणातील बाजरीकरण, नोकऱ्यांतील कंत्राटीकरण आणि शासकीय संस्थांचे खाजगीकरण, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
दरम्यान, आमदार प्रवीण स्वामी यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला. तसेच पत्रकार संघ, उमरगा यांनीही आंदोलनास समर्थन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
मोर्च्याचा समारोप करण्यापूर्वी जिजाऊ ब्रिगेड, ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा आणि साऊ एकल महिला समिती यांच्या वतीने मा. तहसीलदार, उमरगा यांना आंदोलनस्थळी बोलावून घेण्यात आले. त्यांच्याकडे केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये परीक्षा व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता आणणे, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदे करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे तसेच शिक्षणातील बाजरीकरण, नोकऱ्यांतील कंत्रांटीकरण आणि शासकीय संस्थांतील खासगीकरण रोखण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात ॲड. शीतल चव्हाण, रेखाताई पवार, विजय जाधव, डॉ. उदय मोरे, सत्यवती इंगळे, वैशाली जाधव, पूजा सूर्यवंशी, शांतकुमार मोरे, डॉ. पृथ्वी बेळंबकर, राम गायकवाड, हरीश डावरे, प्रा. राजू बटगिरे, ॲड. अर्चना जाधव,ऐ करिम शेख, किशोर बसगुंडे, ॲड. ख्वाजा शेख, सतीश पवार, आण्णासाहेब पवार, शबाना उडचणे-शेख, इरान्ना बसगुंडे, बबीता मदने, विजय चितली, लक्ष्मण शिंदे, धानाय्या स्वामी, ज्योती माने, यशोदा पवार, ज्योती रजपूत, अविनाश रेणके, प्रतिभा पणूरे, प्रदीप चौधरी, व्यंकट भालेराव, रोहिदास वाघमारे, काशिनाथ पाटील, दिनेश पाटील, युसूफ मुल्ला, संजय कांबळे, रेखा साळवे यांच्यासह शेकडो विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा