*करमाळा तालुका -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9850686360*
संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराजाचा दिंडी पालखी सोहळा शनिवार दिनांक 18 जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्याची शीव ओलांडून सोलापूर जिल्ह्यात, करमाळा तालुक्यातील रायगाव येथे दाखल होतो . हजारो भाविकांनी भक्तिभावाने पालखीचे स्वागत करण्यात येते . यावेळी हलग्यांचा कडकडाट, अबीर गुलालाची मुक्त उधळण, पुष्प वर्षाव अशा जल्लोषमय वातावरणात रायगावी भक्तीचा मळा फुलला जातो . यावेळी करमाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित माने म्हणाले की,
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात दाखल होणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी करमाळा तालुक्यातील पोलीस प्रशासन व युनिव्हर्सल करिअर अकॅडमीचे विद्यार्थी पुर्णपणे सज्ज झाले आहे. हा पालखी सोहळा हा शनिवार दिनांक 18 जुलै रोजी करमाळा तालुक्यातील रायगाव येथे हा पालखी सोहळा येणार आहे त्यानंतर रायगाव त
येथून रविवार दिनांक 19 जुलै रोजी करमाळा शहरातील सुभाष चौक येथे भाविक भक्तांना दर्शन घेण्यासाठी थांबणार आहे या पालखी सोहळ्याचे भाविक भक्तांनचे व्यवस्थित दर्शन घेण्यासाठी व वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी करमाळा पोलिस प्रशासन व युनिव्हर्सल करिअर अकॅडमीचे विद्यार्थी सज्ज रहाणार आहेत. करमाळा शहरातील सुभाष चौक येथून पुढील मार्गस्थ होईल तर ही पालखी सोहळा सुभाष चौक ते झरे फाटा पर्यंत युनिव्हर्सल करिअर अकॅडमीचे विद्यार्थी यांच्या साह्याने व करमाळा प्रशासन यांच्या वतीने सुरक्षा ठेवण्यात येणार आहे . झरे फाटा ते जेऊर पर्यंत पोलिस प्रशासन व विविध अकॅडमीच्या माध्यमातून ही सुरक्षा करण्यात येईल.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा