*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माळशिरस येथील सौ.शोभा तानाजी वाघमोडे यांचे कुटुंबाने अहोरात्र कष्ट करून आपल्या सीमेवरील सैनिकांसाठी तब्बल ६,००० राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या आहेत.या सर्व राख्या सीमाभागात तैनात असलेल्या जवानांसाठी रवाना करण्याचा कार्यक्रम माळशिरस पंचायत समिती तेथे प्रमुख पाहुणे डीवायएसपी प्रदीप गोरड व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री,आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आला होता
या कार्यक्रमासाठी माजी सैनिक संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश तोरसे, जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग वाघमोडे,भोसले साहेब,
पंचायत समिती सदस्य आनंद शेंडगे,सुभेदार मेजर राजू खराडे वेळापूर,ऑनररी नायब सुभेदार राजू पाटील नातेपुते,सुभेदार मोरे महाराज नातेपुते,मारुती वाघमोडे,हरिश्चंद्र साळुंखे,वीर पत्नी सिंधू ढोबळे वीर पत्नी शोभा सावंत,नगरसेविका ॲडव्होकेट रेश्मा टेळे, नगरसेविका पुष्पाताई कोळेकर, पांडुरंग वाघमोडे,विष्णू गोरड, शिवाजी गोरड,विकास कोळेकर बापू वाघमोडे,वंदना कोळेकर, अहिल्या वाघमोडे,राणी साठे, पूजा ढावरे,फार्मासिस्ट मकरंद कुदळे,नितीन गायकवाड,सचिन गाडेकर,जगदीश राजमाने, पत्रकार भारत मगर,एल.डी. वाघमोडे,निनाद पाटील, लक्ष्मीकांत कुरुडकर,स्वप्निल राऊत,संजय हुलगे तसेच तालुक्यातील आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*अहोरात्र मेहनत आणि देशप्रेम**
वाघमोडे कुटुंबाने गेल्या काही महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरू केली होती.घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या कामात हातभार लावला.कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना.केवळ सैनिकांबद्दल असलेल्या आदरयुक्त भावनेतून या कुटुंबाने हा संकल्प पूर्ण केला.
*चौकट*
"आपण सण-उत्सव आपल्या घरात सुरक्षितपणे साजरे करतो कारण आपले सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात.त्यांच्या मनगटावर आपल्या प्रेमाची राखी बांधली जावी आणि त्यांना घरच्यांची कमतरता भासू नये,याच एका भावनेने आम्ही या राख्या बनवल्या आहेत."
-सौ शोभा तानाजी वाघमोडे
माळशिरस
*राख्यांचे वैशिष्ट्य संपूर्ण स्वदेशी आणि पर्यावरणपूरक* राख्या बनवण्यासाठी तिरंगा कलरमध्ये सुती दोरे,मनी,कुंदन या साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
*हस्तकला:** प्रत्येक राखी हाताने तिरंगा कलर मध्ये अत्यंत आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आली आहे.
* पत्राद्वारे भावना *
राख्यांसोबतच प्रत्येक सैनिकासाठी शुभेच्छा देणारे आणि त्यांचे आभार मानणारे एक लहानसे पत्रही पाठवण्यात आले आहे.
*सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव**
एका सामान्य कुटुंबाने स्वतःच्या खर्चाने आणि वेळेची गुंतवणूक करून राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ही बातमी सोशल मीडियावर पसरताच अनेक नागरिकांनी या कुटुंबाच्या राष्ट्रप्रेमाला सलाम केला आहे. जवानांप्रती असलेले हे निस्सीम प्रेम आणि आदर समाजातील इतरांनाही नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार सावता गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार निनाद पाटील यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा