Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३० जुलै, २०२६

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी २,५२,५००/- रूपये किंमतीचा गांजा व ८,००,०००/-रू किंमतीची पजेरो स्पोर्ट कार असा एकुण १०,५२,५००/-रू चा मुददेमाल केला जप्त

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


याबाबत  सविस्तर हकिकत अशी कि, दि १७/०७/२०२६ रोजी रात्री ०८/५० वा ते रात्री १०/०० वा चे दरम्यान मौजे पांगरे ता. करमाळा हददीतील टेंभुर्णी ते जेउर जाणारे रोडचे बाजुला पांगरे स्माशान भुमीजवळ इसम नामे रोहित शिवाजी केचे वय २४ वर्षे रा. गारअकोले ता. माढा जि. सोलापुर हा त्याचे ताब्यातील ८,००,०००/-रू किंमतीची सिल्व्हर रंगाची पजेरो स्पोर्ट कार क्रमांक एमएच-१२-केएफ-९८९९ या गाडीचे मध्ये २,५२,५००/-रू १० किलो ग्रॅम गांजा बेकायदेशिर रित्या विक्री करण्याच्या उददेशाने घेवुन जात असताना स्वतःचे कब्जात बाळगलेला मिळुन आला आहे.


करमाळा पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर यांना गोपनिय बातमी मिळाली की, मौजे पांगरे ता. करमाळा येथे एक इसम गांजा विक्रीकरीता घेवुन येणार आहे अशी विश्वसनीय माहीती प्राप्त झाली. त्याबाबत त्यांनी आम्हांस माहिती दिली असता आम्ही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो. करमाळा उपविभाग, करमाळा यांना फोनद्वारे माहिती दिली व सदर बातमीतील माहीती प्रमाणे कारवाई करीता लागणारे लेखी अधिकार पत्र घेवून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून आम्ही स्वतः शासकिय पंच पोलीस स्टाफ असे पांगरे हददीकडे रवाना झालो.



सदर ठिकाणी गेल्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे एक इसम अंधारामध्ये एक पजेरो स्पोर्ट कार घेवुन थांबला असल्याचे आम्हा पोलीस पथकाला दिसुन आला. त्यांचा आम्हास मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आला. त्यावेळी आमचे पोलीस पथकाने सदर इसमास घेराव टाकुन आम्ही स्वतःव सोबतचे पंचानी व पोलीस स्टाफचा पुर्ण परीचय देवुन आपले ओळखपत्र दाखवुन पोलीस असल्याचे आम्ही परीचय दिला सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रोहित शिवाजी केचे वय २४ वर्षे रा. गारअकोले ता. माढा जि. सोलापुर असे सांगितले.

सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही स्वतः पंचासमक्ष रोहित शिवाजी केचे वय २४ वर्षे रा. गारअकोले ता. माढा जि. सोलापुर याचेकडे माहिती घेतली असता त्याचे ताब्यात

१) २,५२,५००/-रू. किं पाच प्लॅस्टिकच्या पिशव्या प्रत्येक पिशवीमध्ये झाडपत्ती सारखा ओलसर व उग्र वास येणारा १० किलो १०० ग्रॅम गांजा प्रति किलो अंदाजे भाव २५,०००/-रू प्रमाणे २) ८,००,०००/-सिल्व्हर रंगाची पजेरो स्पोर्ट कार क्रमांक एमएच-१२-केएफ-९८९९ कि.अं.

एकुण १०,५२,५००/- रूपये किंमतीचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त केला.

सदर बाबत पोकॉ/२१४२ गणेश लालासाहेब शिंदे यांनी आरोपी नामे रोहित शिवाजी केचे वय २४ वर्षे रा. गारअकोले ता. माढा जि. सोलापुर याचे विरूध्द सरकार तर्फे फिर्याद दिली असुन गुरनं ६४४/२०२६ अन्वये एन.डी.पी. एस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (II), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास bbbbbसदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. विजय कबाडे, मा. अंजना कृष्णा व्ही.एस. सो। सहा. पोलीस अधिक्षक (भा.पो.से.), करमाळा उपविभाग करमाळा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने, सहा. पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पो.उप.निरी. / संदीप बनकर, पोहेकॉ/१२४ दुष्यंत ढेंबरे, पो.हे.कॉ./१५० लोहार, पो.हे.कॉ./१८४५ अलिममलिक शेख, पो.कॉ./ ८५६ अर्जुन गोसावी, पो.कॉ. २१४२ गणेश शिंदे, पो. कॉ. / १५१० रमेश फुगे, पो.कॉ. / २०२९ चेतन पवार, चा.पो.कॉ./११९८ ज्योतीराम बारकुंड यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा